मालवणात काँग्रेसकडून शिवरायांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात काँग्रेसकडून शिवरायांना अभिवादन
मालवणात काँग्रेसकडून शिवरायांना अभिवादन

मालवणात काँग्रेसकडून शिवरायांना अभिवादन

sakal_logo
By

swt1922.jpg
83876
मालवणः शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना साईनाथ चव्हाण. सोबत काँग्रेस पदाधिकारी.

काँग्रेसतर्फे शिवजयंती साजरी
मालवण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज वायरी येथील शिवरायांच्या पुतळ्यास तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, वायरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा जिल्हा युवक माजी अध्यक्ष देवानंद लुडबे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाडगावकर, महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, वायरी उपसरपंच प्राची माणगावकर, ग्रामस्थ प्रदीप वेंगुर्लेकर, दत्ता मयेकर, डिचवलकर, मयेकर, अॅड. अमृता मोंडकर व इतर पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. तालुकाध्यक्ष धुरी यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना लाडू वाटप केले. सूत्रसंचालन लुडबे यांनी केले.
..............
swt1923.jpg
83877
देवबागः प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत विनया घाटवळ प्रथम
मालवण : देवबाग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ येथे शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत विनया घाटवळ हिने प्रथम क्रमांक पटकावला. प्रशालेत ३९३ वी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधून चौथीच्या परिसर अभ्यास भाग दोन अर्थात शिवछत्रपतींचा इतिहास या पुस्तकावर आधारीत प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यात शर्वरी कांदळगावकर हिने द्वितीय, तर चार्वी येरागी हिने तृतीय क्रमांक मिळविला. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणोपयोगी साहित्य बक्षीस म्हणून वितरीत करण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रशालेचे शिक्षक महादेव घोडके यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
..............