rat1940.txt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rat1940.txt
rat1940.txt

rat1940.txt

sakal_logo
By

तरवळ घोडखिंड अपघातातील स्वाराविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी, ता. १९ः तालुक्यातील निवळी ते जयगड रस्त्यावर तरवळ-घोडखिंड येथे नाणीज येथील वारी करुन घरी परतणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात पत्नी गंभीर जखमी झाली. जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांना मृत घोषित केले. विलास रविश्चंद्र वझे (वय ६०, रा. सांडेलावगण, वाकणवाडी- जयगड, रत्नागिरी) असे संशयित वृद्ध स्वाराचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १३) सायंकाळी चारच्या सुमारास तरवळ घोडखिंड रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विलास वझे दुचाकी ( एमएच-०८एक्स ०८१७) सोबत पत्नी वर्षा वझे हिला घेऊन नाणीज येथील वारीला गेले होते. परत येत असताना दुचाकी निष्काळजीपणे चालविल्यामुळे दुचाकी खड्यात जाऊन आपटली. या अपघातात पत्नी वर्षा रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल किशोर जोशी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.