1000 रिक्षाचालकांना डिझेल,पेट्रोल 20 रूपयांनी स्वस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

1000 रिक्षाचालकांना डिझेल,पेट्रोल 20 रूपयांनी स्वस्त
1000 रिक्षाचालकांना डिझेल,पेट्रोल 20 रूपयांनी स्वस्त

1000 रिक्षाचालकांना डिझेल,पेट्रोल 20 रूपयांनी स्वस्त

sakal_logo
By

rat१९p४३.jpg-KOP२३L८३९४० ओळी :
खेड ः आमदार योगेश कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा माजी सभापती सुरेश उसरे आणि कार्यकर्ते

१००० रिक्षाचालकांना डिझेल,पेट्रोल २० रूपयांनी स्वस्त
योगेश कदम यांचा वाढदिवस ;शुभेच्छांच्या वर्षावाने गहिवरले
खेड, ता. १९ : दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी शनिवारी खेड, दापोली, मंडणगड तालुक्यातील कार्यकर्त्यांसह अन्य तालुक्यांतील हितचिंतकांची जामगे निवासस्थानी रीघ लागली.तालुका शिवसेनेच्यावतीने तालुक्यातील १ हजार रिक्षाचालकांना डिझेल व पेट्रोल २० रूपयांनी स्वस्त देण्याचा अभिनव उपक्रमही राबवण्यात आला. शनिवारी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत भरणे येथील मेहता पेट्रोल पंप व सरस्वती पेट्रोल पंप येथे रिक्षाचालकांना २० रूपयांनी स्वस्त डिझेल व पेट्रोल वितरित करण्यात आले.
रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा ओघ सुरूच होता. शुक्रवारी रात्री १२ वाजता तमाम कार्यकर्ते व कुटुंबियांच्या साक्षीने आमदार कदम यांनी वाढदिवसाचा केक कापला, जामगे निवासस्थानी शुक्रवारी रात्री माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम, आई ज्योती कदम, पत्नी श्रेया कदम, बहीण योगीता कापडी, भाऊ सिद्धेश कदम उपस्थित होते. शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच खेड, दापोली, मंडणगड तालुक्यांसह चिपळूण, गुहागर, मुंबई, पुणे येथील कार्यकर्ते व हितचिंतकांनी गर्दी केली होती. शनिवारी दिवसभर तिन्ही तालुक्यांत विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती.
जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, अरूण कदम, विजय जाधव, सचिन धाडवे, महेंद्र भोसले, कुंदन सातपुते, अरविंद चव्हाण, माधवी बुटाला, संजय मोदी, शैलेश कदम आदींनी आमदार कदम याचे अभिष्टचिंतन केले. तालुका कबड्डी असोसिएशन यांच्यावतीने एसटी आगाराच्या मैदानात आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या प्राभारंभा दरम्यानही आमदारावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

मोफत नेत्रतपासणी शिबिर
आमदार कदम यांच्या वाढदिवसानिमित्त अस्तान शिवसेना विभागाच्यावतीने अस्तान विभागातील चाटव, वडगाव, नांदिवली,मोहाने, किंजळे, कुंभाड या ७ गावांमध्ये पचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी १२ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत मोफत नेत्रतपासणी व चष्मे वाटप करण्यात आले. या सातही गावांमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिरास रूग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.