
सावंतवा़डीत शिवसेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
swt203.jpg
84019
सावंतवाडी : शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवजयंती साजरी करताना पदाधिकारी.
सावंतवा़डीत शिवसेनेतर्फे
शिवजयंती उत्साहात साजरी
सावंतवाडीः हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येथील श्रीधर अपार्टमेंटमध्ये शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, महिला शहर संघटक भारती मोरे, ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ नारोजी, गजानन नाटेकर, विश्वास घाग, स्वप्ना नाटेकर, नीलिमा चलवादी, राजन रेडकर, रुपेश कुडतरकर, धारणकर, आबा केसरकर, गजानन सावंत, बाळा शिरसाट, मंगलदास देसाई, परशुराम चलवादी, भारती परब, दत्ता सावंत, कमला मेनन, दीपाली सावंत, एकनाथ हळदणकर उपस्थित होते.
.................
वालावलला आरोग्य शिबिरास प्रतिसाद
कुडाळः मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट (वालावल) आणि ग्लोबल फाउंडेशन (कुडाळ) यांच्यावतीने वालावल येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन कुडाळ पंचायत समिती विस्तार अधिकारी संजयकुमार ओरोसकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात नेत्र, दंत व रक्तदाब तपासणी तसेच आजाराच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. मोफत औषधेही देण्यात आली. शिबिर यशस्वीतेसाठी डॉ. ओंकार वेदक, डॉ. अपूर्वा ठाकूर, डॉ. मिनर्वास परब, डॉ. प्रणव प्रभू यांचे सहकार्य लाभले. वालावल ग्रामसेवक सतीश साळगावकर, ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी, सचिव संदीप साळसकर, ग्लोबल फाउंडेशनचे गुरू देसाई, योगेश गावडे, ट्रस्टच्या सदस्या सीमा चौधरी, रेश्मा साळसकर, शीतल लाड, चित्रा शेठ यांनीही सहकार्य केले. या शिबिरात ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.