किल्ले सिंधुदुर्गवर ''जय शिवाजी''चा जयघोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किल्ले सिंधुदुर्गवर ''जय शिवाजी''चा जयघोष
किल्ले सिंधुदुर्गवर ''जय शिवाजी''चा जयघोष

किल्ले सिंधुदुर्गवर ''जय शिवाजी''चा जयघोष

sakal_logo
By

swt२०१३.jpg
८४०६५
मालवणः किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने आमदार वैभव नाईक यांच्यासह पदाधिकारी, शिवप्रेमींनी शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले.

सिंधुदुर्गवर ‘जय शिवाजी’चा जयघोष
प्रथमच शिवजयंती सोहळाः आमदार नाईकांसह शेकडो शिवप्रेमींची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २० ः येथील किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात महाराजांचे नवीन सिंहासनाचे बांधकाम केल्यानंतर काल (ता. १९) प्रथमच आमदार नाईक तसेच शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. ''जय भवानी...जय शिवाजी'' अशा घोषणांनी, ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मंदिरात आमदार नाईक यांच्या हस्ते मूर्तीस जिरेटोप, पुष्पहार अर्पण करण्यात आला. भगवे फेटे, झेंडे यामुळे किल्ला परिसर भगवामय बनला होता.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात साजरी करण्यात येते. छत्रपतींनी बांधलेल्या किल्ल्यांमध्ये किल्ले सिंधुदुर्गला ऐतिहासिक महत्त्व आहे. या किल्ल्यात देशातील एकमेव असे महाराजांचे शिवराजेश्वर मंदिर आहे. आमदार नाईक यांनी पाठपुरावा करून छत्रपतींच्या सिंहासनाचे नवीन बांधकाम नुकतेच करण्यात आले. यानंतर आज प्रथमच किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा गायन सादर करण्यात आले. लहान मुलांसाठी शिवकालीन वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. तालुक्यातील शालेय विद्यार्थी यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. महिलाही पारंपरिक वेशभूषा परिधान करत या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. यावेळी आमदार नाईक, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, मंदार केणी, यतीन खोत, शिल्पा खोत, मंदार ओरसकर, भाई कासवकर, अनुष्का गावकर, तळगाव सरपंच लता खोत, शहर प्रमुख बाबी जोगी, गणेश कुडाळकर, नितीन वाळके, गणेश कुडाळकर, मालवण महिला आघाडी तालुकाप्रमुख श्वेता सावंत, निनाक्षी शिंदे, महेंद्र म्हाडगूत, सिद्धेश मांजरेकर, करण खडपे, उमेश मांजरेकर, रणजीत परब, वायरी सरपंच भगवान लुडबे, राजू परब उपस्थित होते.