चिपळूण - संभाजी ब्रिगेड शिवजयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - संभाजी ब्रिगेड शिवजयंती
चिपळूण - संभाजी ब्रिगेड शिवजयंती

चिपळूण - संभाजी ब्रिगेड शिवजयंती

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat20p28.JPG ःKOP23L84099
चिपळूण ः संभाजी ब्रिगेडतर्फे सुहास नाईक यांचे स्वागत करताना सुधीर भोसले.


हिंदवी स्वराज्याला हिंदुत्वाकडे नेणाऱ्याना जाब विचारा
प्रा. सुहास नाईक ; माता-पिता हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे सर्वसामान्य रयतेचे राज्य होते. सर्व जातीधर्मातील अठरापगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन आलुतेदार बलुतेदार लोकांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यातून सर्वसमावेशक अशा हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. अशा या हिंदवी स्वराज्याला कोणी हिंदुत्वाकडे नेणार असेल तर त्यांना जाब विचारला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. सुहास नाईक यांनी येथे केले.
चिपळुणात संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पुतळा परिसरात शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी नाईक म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आई-वडिलांच्या अर्थात राजमाता जिजाऊ व शहाजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार स्वराज्याची निर्मिती केली. छत्रपता शिवाजी महाराजांच्या या योगदानाबद्दल कुणीतरी कुणाला तरी दुसऱ्यालाच श्रेय देण्याचा प्रयत्न केला जातो. शिवाजी महाराजांचा गुरू कोणी दुसराच सांगितला जातो; परंतु ते सारे खोटे आहे. शिवाजी महाराजांचे माता-पिता हेच खऱ्या अर्थाने स्वराज्य संकल्पक व त्यांचे गुरू आहेत तर संत तुकाराम हे त्यांचे आध्यात्मिक गुरू आहेत.’
शिवाजी महाराजांच्या या अजोड कार्याची दखल देशी आणि विदेशी इतिहास अभ्यासकांनी घेतलेली आहे. त्यामध्ये ते शिवाजी महाराजांचे मोठेपण व्यक्त करतात. अगदी परकीय इतिहासकार काफी खानने देखील शिवाजी महाराजांचे वेगळेपण नमूद करून ठेवले आहे.

रयतेची काळजी
आपल्या सैन्याच्या प्रमुखाला दिलेल्या पत्रात शिवाजी महाराजांनी येथील शेतकरी आणि रयतेच्या कल्याणाचा विचार मांडत असताना किती दूरदृष्टीने विचार केला आहे, याची जाणीव आपल्याला होते. रयतेच्या शेतीची त्यांच्या पिकांची कशी काळजी घ्यावी, नासधूस होऊ नये, याची कशी खबरदारी घ्यावी याबाबतचे सविस्तर विवेचन त्या पत्रामधून मिळते. हे पत्र म्हणजे आदर्श राज्यकर्त्याचा नमुना म्हणावा लागेल.