बांदा शहर, परिसरात शिवरायांचा जयघोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांदा शहर, परिसरात शिवरायांचा जयघोष
बांदा शहर, परिसरात शिवरायांचा जयघोष

बांदा शहर, परिसरात शिवरायांचा जयघोष

sakal_logo
By

swt2028.jpg
84140
बांदाः गडगेवाडी येथे शिवजयंतीनिमित्त मोठ्य‍ा संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. (छायाचित्रः नीलेश मोरजकर)

बांदा येथे शिवरायांचा जयघोष
बांदाः शहर व परिसरात अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्तिस्थ‍ान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना जयंती उत्सवानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा करण्यासाठी अवघी बांदानगरी भगवी झालेली पाहायला मिळाली. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
कट्टा कॉर्नर ते गडगेवाडी दरम्यान ढोलपथकासह भव्य रॅली काढण्यात आली. स्थानिक युवती व महिलांनी लेझीम नृत्ये सादर केली. परिसरात पारंपरिक वेशभूषेत आबालवृद्धांसह महिला, तरुणांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य शाम मांजरेकर, बाळू सावंत, मकरंद तोरसकर, राजा सावंत, बांदा पोलिस निरीक्षक शामराव काळे उपस्थित होते. बांद्यात निमजगावाडी, श्रमिक मित्रमंडळ कट्टा कार्नर, मोर्येवाडा येथे शिवजयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आला.
...............
swt2029.jpg
84141
कासार्डेः रस्ताकामाचा प्रारंभ करताना संजय देसाई. सोबत निशा नकाशे, गणेश पाताडे, संतोष पारकर आदी. (छायाचित्र : एन. पावसकर)

कासार्डेत रस्ताकामास प्रारंभ
तळेरेः कासार्डे उत्तर गावठण ते चव्हाटापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा प्रारंभ कासार्डे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळी माजी सरपंच संतोष पारकर, सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, ग्रामपंचायत सदस्य विजय राणे, मिलिंद पाताडे, आण्णा खाडये, जयवंती जमदाडे, श्वेता चव्हाण, वाडीप्रमुख रवींद्र पाताडे, पपी पाताडे, संजय पाताडे, श्रीरंग पाताडे, प्रसाद जाधव, नागेश लडगे, बाबाजी पाताडे, अरुण पाताडे, शांताराम जाधव, प्रभाकर मुणगेकर, भालचंद्र पाताडे, उल्हास पाताडे, महेश पाताडे, विकास पाताडे, बाबू घाडी, दत्ताराम पाताडे, भाई पाताडे, प्रसाद आयरे, गोट्या मुणगेकर, पप्या पाताडे, अमोल जमदाडे, कृष्णा मुणगेकर, बापू घाडी, संकेत सावंत, प्रथमेश पाताडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. हा रस्ता माजी आमदार प्रमोद जठार, आमदार नीतेश राणे यांच्या प्रयत्नातून मंजूर असून ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. .