
निधन
निधन
८४१५१
रियाजुद्धीन काझी यांचे निधन
मालवण, ता. २० : आचरा-काझीवाडी येथील एस. के. काझी वाचनालयाचे कार्याध्यक्ष आणि टोपीवाला हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक रियाजुद्धीन महंमद अली काझी (वय ८२) यांचे काल (ता. १९) सायंकाळी निधन झाले. हिंदी, इंग्रजी, शारीरिक शिक्षण, स्काऊट हे विषयाचे त्यांनी अध्यापन केले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मालवण एज्युकेशन सोसायटीचे ट्रेझरर म्हणूनही काम पाहिले. आचरा येथे एस. के. काझी वाचनालयाचे कार्याध्यक्ष, धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल आचरा स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
८४१५२
निर्मला दीक्षित यांचे निधन
देवगड, ता. २० : तालुक्यातील पडेल येथील निर्मला पुरुषोत्तम दीक्षित (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. पडेल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विकास दीक्षित यांच्या त्या आई, तर येथील छायाचित्रकार वैभव केळकर यांच्या आजी होत.