इन्सुलीत घरोघरी फडकला ''भगवा'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इन्सुलीत घरोघरी फडकला ''भगवा''
इन्सुलीत घरोघरी फडकला ''भगवा''

इन्सुलीत घरोघरी फडकला ''भगवा''

sakal_logo
By

swt2023.jpg
84131
सावंतवाडीः छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना सरपंच तात्या वेंगुर्लेकर. शेजारी नारायण राणे, दिलीप गावडे व अन्य.

इन्सुलीत घरोघरी फडकला ‘भगवा’
शिवरायांना मानवंदनाः शोभायात्रेसह विविध कार्यक्रम उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २०ः ढोल-ताश्यांच्या गजरात भव्य शोभायात्रा, पालखी, ऐतिहासिक नाटक, डबलबारी असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पालखी व प्रत्येक घरासमोर झेंडा उभारून इन्सुलीत आगळीवेगळा शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. डोबाशेळ येथून सुरू झालेली रॅलीची सांगता गावठण येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकस्थळी करण्यात आली. यावेळी शाळकरी मुलांनी केलेले प्रबोधनात्मक कार्यक्रम लक्षवेधी ठरले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सव समिती व इन्सुली ग्रामस्थांच्यावतीने इन्सुली येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. संत सोहिरोबनाथ मंदिर येथून शोभायात्रेची सुरुवात झाली. बांदा उपसरपंच जावेद खतीब यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उत्सव समिती प्रमुख नारायण राणे, सहायक पोलिस निरीक्षक श्यामराव काळे, माजी सरपंच नाना पेडणेकर, कौस्तुभ गावडे, नितीन राऊळ, आपा आमडोसकर, दिलीप कोठावळे उपस्थित होते. ढोल-ताश्यांच्या गजरात शोभायात्रेची सुरुवात झाली. कोनवाडा, कुडवटेंब, खामदेव नाका व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक गावठण येथे सांगता करण्यात आली. यादरम्यान सावंतटेंब, खामदेव नाका येथे शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. गावठण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सरपंच तात्या वेंगुर्लेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानिमित्त मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. शिवजन्म, पोवाडे, प्रबोधनात्मक भाषणे असे विविध कार्यक्रम शाळकरी मुलांनी सादर केले. यात प्राथमिक शाळांतील मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. इन्सुली गावातील विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन उत्सव समिती प्रमुख बबन राणे व इन्सुली ग्रामस्थांनी केले.
सायंकाळी सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते रंगमंचाचे उद्घाटन झाले. यावेळी माजी सभापती अशोक दळवी, गजानन नाटेकर, मंडळ अध्यक्ष दिलीप कोठावळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद गावकर यांनी केले. त्यानंतर बबन राणे दिग्दर्शित ‘आधी लगीन कोंढण्याचे’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. या नाट्यप्रवेशिकेला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बुवा व्यंकटेश नर विरुद्ध बुवा वैभव सावंत यांच्या डबलबारी सामन्याने कार्यक्रमात रंगत आली.