वारिसे अपघाती मृत्यू केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारिसे अपघाती मृत्यू केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी
वारिसे अपघाती मृत्यू केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी

वारिसे अपघाती मृत्यू केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी

sakal_logo
By

swt219.jpg
84313
ओरस : अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना निवेदन देताना पत्रकार संरक्षण समितीचे पदाधिकारी.

वारिसे अपघाती मृत्यू केस
फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी
पत्रकार संरक्षण समितीः प्रशासनास निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ः पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या अपघाती मृत्यूची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी पत्रकार संरक्षण समिती, सिंधुदुर्गच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्याकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन समितीच्या वतीने देण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार वारिशे यांचा अपघाती मृत्यू आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पत्रकारांवर होत असलेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांसंदर्भात पत्रकार संरक्षण समिती (महाराष्ट्र) सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची भेट घेत लेखी निवेदन दिले. पुरोगामी महाराष्ट्रात पत्रकारांवर वारंवार हल्ले होण्याच्या घटनांत वाढ होत असून पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची कडकपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रसाद भास्कर मडगावकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिळणकर, जिल्हा सचिव शैलेश मयेकर, खजिनदार वासुदेव उर्फ नयनेश गावडे, जिल्हा संघटक जाफर शेख, सहसचिव यशवंत माधव, सहखजिनदार मदन मुरकर आदी उपस्थित होते.