कोकणातील श्री देव वेताळ उर्फ वेतोबा

कोकणातील श्री देव वेताळ उर्फ वेतोबा

rat२२१२.txt

(१६ फेब्रुवारी टुडे चार)
( टुडे पान ३ साठी)

जनरिती- भाती................ लोगो

rat२२p१.jpg ः
८४५०४
डॉ. विकास शंकर पाटील
rat२२p२.jpg ः
८४५०५
श्री देव वेतोबा


कोकणात आढळणारा वेताळ हा देवतेच्या स्वरूपात मानला जातो. कोकणातील वेताळाचे स्वरूप खूपच वेगळे दिसते कारण, काही ठिकाणी त्याला वेतोबा असेदेखील संबोधले जाते. वेताळ या शब्दातील ''ळ'' चा लोप करून ''बा'' हा आदरार्थी शब्द वापरला जातो. बा म्हणजे बाप. कोकणातील वेतोबाचे हेच सामर्थ्य आहे. काही गावात तर वेताळ उर्फ वेतोबा हाच त्या गावचा प्रमुख ग्रामदैवत आहे. देऊळवाडा येथे देव वेताळ, पोईप येथे श्री देव वेताळ तर मळेवाड येथे श्री देव वेतोबा, नानोस येथे श्री देव वेतोबा, परूळेचा श्री देव वेतोबा, आरवलीचा श्री देव वेतोबा कोकणातील अशा विविध गावात देव वेताळ उर्फ वेतोबा या नावाने वेताळाची मंदिरे असल्याचे दिसते.

- डॉ. विकास शंकर पाटील
-

कोकणातील श्री देव वेताळ उर्फ वेतोबा

कोकणात चाळा प्रमाणे मोठ्या प्रमाणात आढळणारी दुसरी देवता म्हणजे वेतोबा होय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासकरून या वेतोबाची मंदिरे मोठ्या प्रमाणात आढळतात. दक्षिण कोकणात १४३ मंदिरे ही श्री वेताळ उर्फ वेतोबाची आहेत. त्यामध्ये सावंतवाडी ३७, वेंगुर्ले २९, मालवण २७, कुडाळ २१ कणकवली १९ व देवगड १० अशी आकडेवारी डॉ. भालचंद्र आकलेकर यांनी आपल्या '' कोकणचा सांस्कृतिक इतिहास'' या ग्रंथात दिली आहे. यातील ७ मंदिरातील मूर्ती या जैन तीर्थकरांच्या असाव्यात, असे मत त्यांनी नोंदवले आहे. वेताळ हा सर्व भुतावळीचा नायक मानला जातो. सर्व भुते ही वेताळाच्या आज्ञेत वागतात. वेताळ हा मसनवटीचा मालक मानला जातो. वेताळाची मूर्ती पाषाणाची किंवा लाकडाची असते. वेताळाची वेताळ व आग्या वेताळ अशी दोन रूपे मानली जातात. भगवान शंकर यांना भुतावळीची देवता मानली जाते, त्या अनुषंगानेच भुतावळीचा नायक म्हणून वेताळालाही शिवाचे पूर्वरूप मानले जाते.
ल. रा. पांगारकर यांनी तर श्री वेताळ म्हणजे खंडेराव उर्फ खंडोबा असावा, असा अंदाज लावला आहे तर अय्यनार किंवा शास्ता हा वेताळाचा दाक्षिणात्य अवतार मानला जातो. उत्तर भारतात वेताळ विजयसेन नावाने वावरतो आणि भुताखेतांवर राज्य करतो. या साऱ्यातूनच वेताळ हा भुतावळीचा नायक आहे, हे स्पष्ट होते. वेताळ या शब्दाची उत्पत्ती सांगताना यातील पहिले अक्षर बाजूला केल्यास ताळ हा शब्द दुसरे अक्षर बाजूला काढल्यास वेळ हा शब्द उरतो आणि तिसरे अक्षर बाजूला काढल्यास वेता हा शब्द उरतो. वेता म्हणजे वेत. वेताने वेळेवर ताळ्यावर आणणारी शक्ती म्हणजे वेताळ. वेताळामध्ये भुताकेतांना व अपप्रवृत्तीला विरोध करण्याची शक्ती असते. या शक्तीचे स्वरूप अत्यंत प्रभावी परिवर्तनशील असते म्हणून वेताळही रक्षक देवता मानली जाते.
आरवलीत प्रमुख ग्रामदेवता म्हणून वेतोबाला मानले जाते. पूर्वी या वेतोबाची मूर्ती फणसाच्या लाकडाची होती. फणसाचे झाड येथे पवित्र मानले जाते. आपण ज्या ठिकाणी आहे तेथून जवळ असणाऱ्या फणसाच्या झाडाजवळ आपली मनोकामना व्यक्त केल्यास वेतोबा ती पूर्ण करतो, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे आपल्या मनातील इच्छा कोणत्याही फणसाच्या झाडाजवळ बोलल्यावर ती वेतोबाला समजते असे येथील लोकांचे मत आहे. त्यामुळे येथे फणसाचे झाड तोडले जात नाही. या परंपरेमुळे येथील फणस झाडांना संरक्षण मिळाल्याचे दिसते. नैसर्गिक आपत्तीने जरी फणसाचे झाड कोसळले तरी त्याचे काय करावे या संदर्भात वेतोबाचा कौल घेतला जातो तसेच एखादे झाड अडथळा ठरत असेल तर वेतोबाचा कौल घेऊनच ते तोडले जाते. इथे वेतोबाला चामड्याच्या पादुका अर्पण करण्याची प्रथा आहे. वेतोबाला भक्तगण पादत्राणाचा नवस बोलतात. भक्तांनी अर्पण केलेल्या अशा पादुका मंदिरात एका बाजूला काचपेटीत ठेवल्या आहेत. वेतोबा या पादुका घालून गावच्या रक्षणासाठी फिरत असतो. त्यामुळे या पादुका झिजतात, असे इथे मानले जाते. पादुकांबरोबरच केळीच्या घडांचा नवसही वेतोबाला बोलला जातो. श्री देव वेतोबा नवसास पावल्याच्या शेकडो कथाही ऐकावयास मिळतात. सतराव्या शतकात सावंतवाडीकर व पोर्तुगीज यांच्यात वारंवार लढाया होत. इब्रामपूर येथील लढाई वेतोबाला नवस केल्यामुळे सावंतवाडीकर विजयी झाल्याचे सांगितले जाते. त्या वेळी सावंतवाडीकरांनी वेताळ भाटी वगैरे जमिनी देवस्थानास बक्षीस दिल्याचे दाखले मिळतात. वेंगुर्ले शहरात कॅम्पात श्री देव वेतोबांचे मंदिर असून, हा शिवाच्या रूद्र गणापैकी एक असावा असे मानण्यात येते. याच्या जत्रेदिवशी भटवाडीतील ब्राह्मणांना ११ वड्यांचा नैवेद्य लागतो. या मंदिरातील वेतोबाच्या मूर्तीचा चेहरा भटवाडीच्या दिशेस आहे त्याबद्दल एक कथा ऐकायला मिळते. वेतोबाची स्थापना करताना घाडीवाडीतील व इतर वाड्यातील लोकांनी जे मागितले ते दिले. नंतर भटवाडीतील लोकांना त्यांनी विचारले, "तुम्हास काय देऊ?" त्या वेळी भटवाडीतील निस्सिम भाविकांनी सांगितले, "आम्हाला पैसेअडके, वतनदारी नको. तुझे दर्शन सतत घडावे म्हणून तुझा चेहरा आमच्या दिशेने असावा". भटवाडीकरांची ही इच्छा वेतोबाने पूर्ण केली म्हणूनच वेतोबाचा चेहरा भटवाडीकडे आहे. आजगावच्या वेताळ देवाची कीर्तीही प्रसिद्ध आहे. सावंतवाडीच्या तत्कालीन राज्यकर्त्यांशी संबंध असलेल्या कृष्णरावाच्या खुनाचे गुढ वेतोबाच्या व इतर देवांच्या वाऱ्यानेच उघडकीस आणले. त्यामुळे विजापूरकर सरदाराने सरदेसाई (सावंतवाडीचे) यांच्यावर ठपका ठेवला. तेव्हा संतप्त होऊन सरदेसाईंनी आजगाव देवस्थानच्या नेमणुका बंद केल्या. वेताळ उर्फ वेतोबाची अशी अनेक कथांतून किर्ती ऐकायला मिळते. या देवतेविषयी जनमानसात आस्था व भक्ती असल्याचे दिसते. या वेताळ उर्फ वेतोबांच्या मूर्ती तर प्रत्येक ठिकाणी आपले वेगळे अस्तित्व घेऊन प्रकट होताना दिसतात.

(लेखक महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक आहेत.)

---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com