
काजू प्रक्रियाधारक संघावर चाळके यांची नियुक्ती
rat२२२०.txt
बातमी क्र..२० ( पान २ साठी)
rat२२p१८.jpg ः
८४५२८
प्रकाश चाळके.
काजू प्रक्रियाधारक संघावर चाळके यांची नियुक्ती
साखरपा, ता २२ ः रत्नागिरी जिल्हा काजू प्रक्रियाधारक संघाच्या कार्यकारिणीवर संदीप दळवी यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली असून, प्रकाश चाळके यांचीही कार्यकारिणीत निवड झाली आहे.
जिल्हा काजूधारक संघाच्या या सभेत काजू व्यवसायातील अनेक विषयांवर चर्चा झाली. नवीन काजू खरेदी व विक्री यात येणाऱ्या अडचणी यावर मात कशी करावी याबाबत सखोल चर्चा झाली. नवीन सभासद नोंदणी व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची या सभेत चर्चा झाली. मालाचा दर्जा कसा जपावा, सॉर्टिंगबाबतही चर्चा झाली. छोट्या-मोठ्या काजू कारखानदारांनी काजू बीच्या दर्जाबाबत चर्चा केली. दर दाम ठरवण्याबाबत ही चर्चा करण्यात आली. शासनाचा काजू प्रकल्पाबाबत आलेला जीआर यावरील सखोल चर्चा करण्यात आली. नव्याने होणाऱ्या शासनाच्या काजू बोर्डात रत्नागिरी जिल्ह्याचा एकतरी प्रतिनिधी जावा, असे सर्वांनुमते ठरवण्यात आले; मात्र यासाठी जिल्ह्यातून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी होणे गरजेचे आहे आणि ही सदस्य नोंदणी जास्त होईल तेव्हाच आपला प्रतिनिधी वरिष्ठ पातळीवर पाठवता येईल, असे सर्वानुमते ठरले.
याच सभेत नवीन कार्यकारिणी सर्वांनुमते जाहीर करण्यात आली. नवीन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी रत्नागिरी दळवी कॅश्यूचे संदीप दळवी यांची अध्यक्ष म्हणून तर सचिवपदी संदेश पेडणेकर, मुकेश देसाई यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. तसेच एकूण १८ सदस्यांची निवड करण्यात आली. चाफवली येथील उद्योजक प्रकाश चाळके यांचीही कार्यकारिणीत निवड झाली. चाळके यांनी काजू तेलप्रक्रिया उद्योगात यशस्वी प्रयोग करून त्यापासून रंग आणि वॉर्निश तयार केल्याची दखल घेत ही निवड करण्यात आली.