निरामय हॉस्पिटल सुरू करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निरामय हॉस्पिटल सुरू करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील
निरामय हॉस्पिटल सुरू करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील

निरामय हॉस्पिटल सुरू करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील

sakal_logo
By

rat२२९.txt

बातमी क्र..९ ( पान ५ साठी)

निरामय हॉस्पिटल सुरू करण्यास शासन प्रयत्नशील

पालकमंत्री उदय सामंत ; तालुक्याला वैद्यकीय सुविधांची गरज

गुहागर, ता. २२ ः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोविड केअर सेंटरसाठी शासनाने निरामय रुग्णालय ताब्यात घेतले आहे; मात्र, कोरोनाची लाट ओसरल्यानंतर हा विषय मागे पडला. मंगळवारी (ता. २१) पत्रकारांनी निरामय हॉस्पिटलबाबत प्रश्न विचारला असता पालकमंत्री उदय सामंत यांनी हे हॉस्पिटल चांगली सेवा पुरवण्यासाठी उत्तम असून राज्यशासन किंवा अन्य संस्थांच्या माध्यमातून हॉस्पिटल लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
गुहागर तालुक्यात मोठे हॉस्पिटल नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होते. दोन वर्षांच्या कोरोना संकटात रानवी येथे दाभोळ वीजप्रकल्प चॅरिटेबल ट्रस्टने येथील नागरिकांसाठी उभारलेले निरामय हॉस्पिटल सुरू व्हावे, अशी गुहागर तालुकावासीयांची आग्रही मागणी होती. ३ जानेवारी २०२२ ला उपविभागीय अधिकाऱ्यांनी निरायम रुग्णालय अधिग्रहित करण्याबाबत तहसीलदार गुहागर यांना पत्र पाठवले. त्यानुसार कार्यवाही करत तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी रुग्णालय आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासी वसाहतीमधील काही खोल्या ताब्यात घेतल्या आहेत. येथे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत ग्रामीण रुग्णालय गुहागरला कळवण्यात आले होते.
शासनाकडून इमारत आणि परिसरातील साफसफाई आणि देखभालीच्या कामांना सुरवातदेखील झाली होती. येथील अंतर्गत प्रकाशव्यवस्था, ऑक्सिजनच्या वाहिन्या, जलवाहिन्या उत्तम असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले होते. तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आणि तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या रुग्णालयाची पहाणी केली होती. मात्र, कोरोनाची लाट ओसरताच या विषयाकडे दुर्लक्ष झाले आणि गुहागरवासीयांची निराशा झाली.
दरम्यान, मंगळवारी राज्याचे उद्योगमंत्री सामंत यांना या हॉस्पिटलबाबत विचारले असता त्यांनी हे हॉस्पिटल आरोग्यसेवा पुरवण्यासाठी योग्य असल्याचे सांगून राज्यशासन किंवा अन्य संस्थांच्या माध्यमातून हॉस्पिटल सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. हे हॉस्पिटल सुरू झाल्यास चांगल्याप्रकारे वैद्यकीय सुविधा तालुक्यासाठी निर्माण होतील, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

---