
चित्रकलेत सार्थक मालवणकर प्रथम
swt2319.jpg
84783
सावंतवाडीः क्रीडातपस्वी (कै.) शिवाजीराव भिसे स्मृतीप्रित्यर्थ अनिल भिसे मित्रमंडळाने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत विजेते व सहभागी विद्यार्थी. सोबत दिलीप वाडकर, अभिमन्यू लोंढे, सुधीर धुमे, अनिल भिसे, अरुण भिसे, अॅड. संतोष सावंत, अनंत जाधव, हरिश्चंद्र पवार आदी.
चित्रकलेत सार्थक मालवणकर प्रथम
सावंतवाडीतील स्पर्धाः शिवाजीराव भिसे स्मरणार्थ उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ः क्रीडातपस्वी शिवाजीराव भिसे यांच्या स्मरणार्थ पहिली ते दुसरीच्या मुलांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सार्थक मालवणकर याने पटकावले. द्वितीय दुर्वा सावंत, तर तृतीय रणवीत रांजणे, तर उत्तेजनार्थ हुनेरा बागवान यांना गौरविण्यात आले. येथील शिवउद्यानमध्ये आयोजित चित्रकला स्पर्धेत सुमारे ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
छायाचित्रकार अनिल भिसे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन पत्रकार अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनिल भिसे यांनी रुपरेषा सांगितली. छायाचित्रकार अनिल भिसे मित्रमंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमास क्रीडा प्रशिक्षक दिलीप वाडकर, अभिनेता सुधीर धुमे, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष अॅड. संतोष सावंत, अनंत जाधव, हरिश्चंद्र पवार, संतोष परब, दीपक गावकर, रिया भिसे, मारिया फर्नांडीस, अक्षता मडगावकर, आनंद धोंड, संदेश पाटील, बेंजामिन फर्नांडीस, अरुण भिसे, जतीन भिसे, हेमंत केसरकर, सागर कोरगावकर, अनिल कुडाळकर आदी उपस्थित होते.
अरुण भिसे, अनिल भिसे, रिया भिसे यांनी स्वागत केले. दिलीप वाडकर यांनी क्रीडातपस्वी शिवाजीराव भिसे यांनी विद्यार्थ्यांना घडविले. क्रीडा क्षेत्रातील त्यांचे उपक्रम प्रेरणादायी होते. त्यांच्या पश्चात त्यांचे विद्यार्थी त्यांचा नावलौकिक बोलून दाखवतात, असे सांगितले. त्यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करून त्यांचे स्मरण केले आहे. हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले.
पत्रकार लोंढे यांनी क्रीडातपस्वी भिसे यांच्या जयंतीदिनी पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेऊन अनिल भिसे मित्रमंडळाने सर्वांसमोर चांगला आदर्श ठेवला आहे. या स्पर्धेमुऴे मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला आहे. स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. पालकांनी सुध्दा लहान वयातच मुलांना स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सुधीर धुमे, मारिया फर्नांडिस यांनी, आभार छायाचित्रकार अनिल भिसे यांनी मानले.