समाज कार्यकर्त्यांचा गौरव स्तुत्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाज कार्यकर्त्यांचा गौरव स्तुत्य
समाज कार्यकर्त्यांचा गौरव स्तुत्य

समाज कार्यकर्त्यांचा गौरव स्तुत्य

sakal_logo
By

swt2320.jpg
23L84784
सावंतवाडी : येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना संजू परब. बाजूला अर्चना घारे-परब, संजना परब, डॉ. दत्तात्रय सावंत, डॉ. नेत्रा सावंत, अॅड. अनिल निरवडेकर, विलास जाधव व अन्य (छायाचित्रः रुपेश हिराप)

समाज कार्यकर्त्यांचा गौरव स्तुत्य
संजू परब ः सावंतवाडीत आदर्शवत व्यक्तींचा गौरव सोहळा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. 23 ः शिवरायांचे विचार आणि आचार खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आचरणात आणण्याचे काम शिवप्रसाद कला, क्रीडा मंडळ आणि शिवधर्म प्रतिष्ठान करत आहे. या मंडळांनी डॉक्टर, शिक्षक, सैनिकांचा केलेला गौरव निश्चितच आजच्या समाजाला दिशादर्शक आहे. हे कार्य सावंतवाडीला भूषणावह असेच आहे, असे गौरवोद्गार माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी काढले.
येथील न्यू खासकीलवाडा चराठा गावडेशेत जवळील शिवप्रसाद कला, क्रीडा मंडळ व शिवधर्म प्रतिष्ठान या दोन्ही मंडळांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात परिसरातील आदर्शवत व्यक्तींचा गौरव केला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष परब, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला नेत्या अर्चना घारे-परब, मराठा समाज उत्कर्ष मंडळाच्या महिला तालुकाध्यक्ष संजना परब, ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक विलास जाधव, मानव अधिकार संस्थेचे अमित वेंगुर्लेकर, शिवप्रसाद कला, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गुरू गावडे, शिवधर्म प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पांचाळ, माजी नगरसेवक विलास जाधव, दादा नगनूर, बालरोगतज्ज्ञ डॉ. दत्तात्रय सावंत, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नेत्रा सावंत, माजी सैनिक हवालदार सुरेश गावडे, सेवानिवृत्त शिक्षक किशोर नाडकर्णी, तबलावादक बंड्या धारगळकर, शिवप्रसाद कला, क्रीडा मंडळाचे व शिवधर्म प्रतिष्ठानचे पदाधिकारी निखिल गावडे, संदेश रेडकर, लक्ष्मीकांत उर्फ बबलू पांचाळ, रवींद्र गोसावी, सुचिता गावडे, रमाकांत पांचाळ, अमय रेडकर, अक्षय रेडकर, काशिनाथ वारंग, शिवा गावडे, राज पांचाळ, आर्यन पांचाळ, आर्यन कुमावत, अभी पवार, बंटी गवस, मसुराज वडार, ऋतुराज आरोंदेकर, यश यादव आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. दत्तात्रय सावंत यांचा नागरी सत्कार संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला. तर डॉ. नेत्रा सावंत यांना अर्चना घारे-परब यांच्या गौरविण्यात आले. माजी सैनिक हवालदार सुरेश गावडे यांचा सत्कार बबलू पांचाळ यांनी, शिक्षक नाडकर्णी यांचा सत्कार गुरू गावडे, तर संजू परब यांचा सत्कार महेश पांचाळ, अमित वेंगुर्लेकर यांचा सत्कार संदेश रेडकर, दादा नगनूर यांचा सत्कार रवींद्र गोसावी, अर्चना घारे यांचा सत्कार संजना परब यांच्या हस्ते करण्यात आला. बंड्या धारगळकर यांचाही सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. सावंत यांनी या सत्काराने मी भारावून गेलो आहे. या मंडळाने आम्हा उभयतांचा जो गौरव केला, त्याबद्दल आम्ही मंडळांचे सदैव ऋणी राहू, असे सांगितले. घारे-परब यांनी शिवप्रसाद कला, क्रीडा मंडळ व शिवधर्म प्रतिष्ठान गेली दहा-बारा वर्षे सामाजिक भावनेतून कार्य करत आहे. हे कौतुकास्पद असून सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या व्यक्तींचे सत्कार व्हायला हवेत. ती सुध्दा एक समाजसेवा आहे, असे स्पष्ट केले. सूत्रसंचालन व आभार ॲड. संतोष सावंत यांनी मानले.