
सांस्कृतिक मंत्रालयाच्या लेखात जगन्नाथराव भोसलेंबाबत लिखाण
swt2323.jpg
84789
जनरल जगन्नाथराव भोसले
सांस्कृतिक मंत्रालयाच्या लेखात
जगन्नाथराव भोसलेंबाबत लिखाण
सुरेंद्र भोसलेंची माहितीः केंद्राचे मानले आभार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ः आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने प्रसिध्द केलेल्या लेखामध्ये तत्कालीन आझाद हिंद सेनेचे सेनापती तथा सावंतवाडीचे सुपुत्र मेजर जनरल जगन्नाथराव भोसले यांच्याबाबत लिखाण केले आहे. खरा नेता हा त्यांच्या चारित्र्याच्या प्रभावातून प्रेरणा देतो. भोसले हे त्या नेत्यांपैकी एक होते. त्यांचे जीवन अनेकांसाठी आदर्श ठरणारे आहे. त्यामुळे नव्या पिढीने त्याच्या विचाराचा बोध घ्यावा, असा गौरव त्यात केला आहे. याबाबतची माहिती त्याचे नातेवाईक तथा आय. एन. ए. परिषदेचे अध्यक्ष सुरेंद्र भोसले यांनी दिली असून दखल घेणाऱ्या केंद्राचे त्यांनी आभार मानले आहेत. त्यांची दखल घेवून समस्त जिल्हावासीयांचा सन्मान केला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
याबाबत श्री. भोसले यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. यात असे म्हटले आहे की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत जगन्नाथराव भोसले यांचा मोठा वाटा होता. त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यात आलेल्या लढाईत मोठा लढा दिला होता. त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांच्यावर हा लेख प्रकाशित केला आहे.