
शिवजयंती
फोटो ओळी
-rat20p31.jpg ः
84801
पावस ः पूर्णगड येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेली रॅली. दुसऱ्या छायाचित्रात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना विद्यार्थी.
---
पूर्णगड किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त रॅली
खारवी समाज परिवर्तन मंच ; ढोलताशा, लेझिमच्या तालावर रॅली
पावस, ता. २३ ः ढोलताशा, लेझिमच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी पूर्णगड किल्ल्यापर्यंत खारवी समाज परिवर्तन मंचाने लेझीम, ढोलताशांच्या गजरात रॅली काढली.
या वेळी महाराष्ट्र कामगार कल्याणचा पुरस्कारप्राप्त राम सारंग, पूर्णगड उपसरपंच अजमिना दर्वेश, सागरी पोलिस ठाणे पूर्णगडचे विजय जाधव, गावडेआंबेरे सरपंच लक्ष्मण सारंग, (कै.) शामराव पेजे हायस्कूल शिवारआंबेरेचे तरळ, ज्येष्ठ शिवप्रेमी रामभाऊ हरचकर, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आदी उपस्थित होते. परिवर्तन मंचच्या शहर शाखेच्यावतीने संजय डोर्लेकर व संजय खडपे यांनी संगीतसाथ केलेले ईशस्तवन, स्वागतगीत सादर करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन समाजकार्य करत राहा. असे आवाहन जाधव यांनी केले. खारवी समाज परिवर्तन मंच या मंचाची कार्याची सुरवातच शिवजयंती साजरी करूनच झाली. शिवारआंबेरे हायस्कूल, डोर्लेकरवाडी महिला मंडळ, आंबेरकरवाडी महिला मंडळ, गावडेआंबेरे शाळा, पूर्णगड खारवीवाडा शाळा, पूर्णगड शाळा क्र. १, लोकरेवाडी, धानबावाडी, सितापेवाडी, पूर्णगड पंचक्रोशीतील शेकडो विद्यार्थी, समाजबांधव रॅलीमध्ये सहभागी झाले होते. सूत्रसंचालन वासुदेव वाघे यांनी केले. सर्व शाळा व मत्स्यगंधा महिला मंडळांनी लोकनृत्ये सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.