
चिपळूण ः चिपळुणात उद्या भाजपाचा कार्यकर्ता संवाद मेळावा
पान ३
चिपळुणात आज भाजपचा
कार्यकर्ता संवाद मेळावा
चिपळूण, ता. २३ ः भारतीय जनता पार्टीचे नेते, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत चिपळूण भाजपतर्फे शुक्रवारी (ता. २४) फेब्रुवारीला सकाळी १० वा. शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात मंत्री अजयकुमार मिश्रा हे भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत. आगामी काळात नगर पालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय नेतृत्व चिपळुणात येत असल्याने येथील भाजप पक्षात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे चिपळुणात त्यांचे जंगी स्वागत आणि कार्यकर्ता मेळावा यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते जोरदार तयारीला लागले आहेत. कार्यकर्ता मेळाव्याला नीलेश राणे, शैलेंद्र दळवी, डॉ. विनय नातू, प्रमोद जठार, दीपक पटवर्धन, केदार साठे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर व शहराध्यक्ष आशिष खातू यांनी केले आहे.