चिपळूण ः खडपोली येथे आजपासून श्री सुकाई देवीचा जत्रोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  खडपोली येथे आजपासून श्री सुकाई देवीचा जत्रोत्सव
चिपळूण ः खडपोली येथे आजपासून श्री सुकाई देवीचा जत्रोत्सव

चिपळूण ः खडपोली येथे आजपासून श्री सुकाई देवीचा जत्रोत्सव

sakal_logo
By

खडपोली येथे आजपासून
श्री सुकाई देवीचा जत्रोत्सव
चिपळूण, ता. २३ ः चार गाव संघटना-खडपोली (दक्षिण विभाग), गाणे, वालोटी, दळवटणे-बागवाडी यांच्यातर्फे २७ ते २८ फेब्रुवारी दरम्यान खडपोली येथे श्री सुकाई, श्री झोलाई, श्री काळिश्री, श्री केदारनाथ देवतांचा त्रैवार्षिक जन्मोत्सव (समा) होणार आहे.
२४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान कबड्डी व क्रिकेटच्या भव्य स्पर्धा होणार आहेत. शुक्रवारी सकाळी ८ वा. क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन, सायं. ७ वा. कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन, रात्री ९ वा. समाज प्रबोधनपर व्याख्यान, २५ला दुपारी ३ वा. होम मिनिस्टर कार्यक्रम, रात्री ९ वा. व्याख्यान, २६ ला दुपारी ३ वा. होम मिनिस्टर कार्यक्रम, सायं. ५ वा. क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना, रात्री ९ वा. पैठणी लकी ड्रॉ सोडत, ९.३० वा. व्याख्यान, १० वा. कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.२७ फेब्रुवारीपासून देवीच्या समा कार्यक्रमाला प्रत्यक्षात सुरवात होणार आहे. सकाळी ८ वा. देवीला अर्पण केलेल्या लाटीच्या वाशाची यथासांग पारंपरिक पद्धतीने पूजन, लाट तोडणे व लाट तयार करणे, दुपारी १ वा. अन्नप्रसाद, २ वा. मान्यवरांचे स्वागत व मनोगत, २.३० वा. लाटीच्या वाशाचे यशासांग पूजन व ढोलताशांच्या गजरात ग्रामदेवतांच्या नामघोषात गाणे ते खडपोली व सोबत श्री केदारनाथ ग्रामदैवत गाणे ग्रामदेवतांच्या पालखीची मिरवणूक, सायं. ६ वा. श्री सुकाई मंदिर खडपोली येथे लाटीची व सोबत ग्रामदैवत श्री केदारनाथ-गाणे, देवतांच्या पालखींचे आगमन विधीयुक्त पूजन, ग्रामदैवत गाणे देवतांच्या पालखीच्या साहाय्याने अग्निप्रज्वलन व नंतर पालखी रिघवणासाठी श्री सुकाई मंदिरामध्ये स्थानापन्न आहे.