माने महाविद्यालयात इलेक्ट्रिक व्हेईकल प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माने महाविद्यालयात इलेक्ट्रिक व्हेईकल प्रशिक्षण
माने महाविद्यालयात इलेक्ट्रिक व्हेईकल प्रशिक्षण

माने महाविद्यालयात इलेक्ट्रिक व्हेईकल प्रशिक्षण

sakal_logo
By

rat२४२२.TXT

बातमी क्र.. २२ (टुडे ३ साठी )

rat२४p१०.jpg ः
८४९६७

देवरूख ः कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. महेश भागवत, ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा. अनिरुद्ध जोशी, अंकित पाटील, प्रशांत रोकडे व अन्य.

माने महाविद्यालयात इलेक्ट्रिक व्हेईकल प्रशिक्षण

५० विद्यार्थी सहभागी ः पीपीटीमुळे प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव

देवरूख, ता. २४ ः येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ऑटोमोबाईल शाखेने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ''इलेक्ट्रिक व्हेईकल ट्रेनिंग'' कार्यशाळेत विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक वाहनांविषयी तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. पाच दिवसांच्या या कार्यशाळेत महाविद्यालयाच्या विविध शाखेतील ५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत ही कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत पेट्रिक ऑटोमोटिव प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित पाटील व ग्रीन मोबिलिटी सोल्युशन, कोल्हापूरचे संस्थापक प्रशांत रोकडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक तसेच सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा. अनिरुद्ध जोशी यांनी प्रास्ताविक करताना संकल्पना व उद्देश सांगितला. डॉ. महेश भागवत यांनी इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाचे येत्या काळातील महत्व स्पष्ट करताना ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक वाहनसंबंधी अधिक अभ्यासासाठी उद्युक्त करेल, असे सांगितले.
इलेक्ट्रिक वाहने व इतर वाहने यामधील फरक समजावून विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाविषयी मुलभूत माहिती प्रमुख मार्गदर्शकांनी सुरवातीला दिली. त्यानंतर इलेक्ट्रिक वाहनांच्या विविध घटकांची माहिती देताना त्यांनी या वाहनांची पॉवरट्रेन, वायरिंग प्रणाली, लिथिअम बॅटरी, बीएमएस पॅक विकसित करणे व त्याचा बॅटरी पॅकमधील उपयोग, मोटरची निवड करणे आदी विषय विस्तृतपणे सांगितले. या वेळी प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी विविध इलेक्ट्रिक वाहने, त्यांचे सुटे भाग तसेच पीपीटीसारख्या माध्यमांचा वापर करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव घेता आला. या कार्यशाळेच्या समारोपावेळी सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. प्रशिक्षण व तंत्रज्ञान उपयुक्त होते, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. कार्यशाळेच्या आयोजनासाठी संस्थाध्यक्ष रवींद्र माने, कार्यकारी अध्यक्षा नेहा माने यांचे मार्गदर्शन लाभले.