संक्षिप्त-निराधार योजनेचा 58 महिलांना लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त-निराधार योजनेचा
58 महिलांना लाभ
संक्षिप्त-निराधार योजनेचा 58 महिलांना लाभ

संक्षिप्त-निराधार योजनेचा 58 महिलांना लाभ

sakal_logo
By

मालवणात आज
विविध कार्यक्रम
मालवण ः मालवण धुरीवाडा (कुरण) येथील स्वामी समर्थ मठात मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा १६ वा वर्धापन दिन सोहळा उद्या (ता.२५) साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी अभिषेक, पूजन, नामस्मरण व सचिन कांबळी-साक्षी कांबळी यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा, दुपारी दीड ते चार महाप्रसाद नंतर त्रिमूर्ती भक्तिसंगम, मालवणचे गायन, सद्गुरू सदानंद माऊली संप्रदाय भजन मंडळ, वायरीचे भजन होणार आहे. १८ ला स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सव साजरा होणार आहे.
--------------
महिलांसाठी
रक्तदान शिबिर
कणकवली ः येथील सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे ९ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त केवळ महिलांसाठीच रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. वागदे गोपुरी आश्रम येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर होईल. या शिबिरात स्वेच्छेने रक्तदान करावे. यासाठी पूर्व नावनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी सिद्धी वरवडेकर, श्रद्धा पाटकर, योगिता लोके, तन्वी भट यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
--
वधू-वर परिचय
मेळावा मुंबईत
कणकवली ः घाडीगांवकर वधुवर सुचक मंडळातर्फे रविवारी (ता. २६) सायंकाळी चार ते सात दरम्यान घाडीगांवकर वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय बिल्डिंग, शारदा टॉकिज शेजारी, दादर पूर्व येथे हा मेळावा होणार आहे. मेळाव्यामध्ये प्रत्यक्षरित्या चर्चा सत्रांसाठी व्यासपीठ दिले जाते. समाजातील नोंदणीकृत व इच्छुक तरुण तरुणींनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
----
मुणगेत आज
गावठी बाजार
मुणगे ः येथील भगवती हायस्कूल व (कै.) वीणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेसच्यावतीने उद्या (ता.२५) गावठी बाजार व खाद्यपदार्थ विक्री महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन भगवती एज्युकेशन सोसायटी व मुख्याध्यापक भगवती हायस्कूलच्यावतीने केले आहे.
--
कुणकेरी येथील
हुडोत्सव मार्चला
सावंतवाडी ः दरवर्षीप्रमाणे यंदाही कुणकेरी गावाचा प्रसिद्ध हुडोत्सव १२ मार्चला होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर गोवा, कर्नाटकसह महाराष्ट्र राज्यात कुणकेरीचा हूडोत्सव प्रसिद्ध आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन कुणकेरी ग्रामस्थांकडून केले आहे.