नव्वद वर्षीय महिलेच्या डोळ्यातून काढला 15 सेंमीचा जंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव्वद वर्षीय महिलेच्या डोळ्यातून काढला 15 सेंमीचा जंत
नव्वद वर्षीय महिलेच्या डोळ्यातून काढला 15 सेंमीचा जंत

नव्वद वर्षीय महिलेच्या डोळ्यातून काढला 15 सेंमीचा जंत

sakal_logo
By

rat२४२४.txt

बातमी क्र. .२४ (टुडे पान २ साठी)
(टीप- जाहिरातदार आहेत.)

फोटो ओळी
- ratchl२४१.jpg ः
८४९८०
डॉ. नदीम खतीब
--
वृद्धेच्या डोळ्यातून काढला १५ सेंमीचा जंत

लाईफ केअर हॉस्पिटल ; शस्त्रक्रिया यशस्वी

चिपळूण, ता. २४ ः शहरातील एका ९० वर्षीय आजीच्या डोळ्यातून १५ सेंटिमीटरचा जिवंत जंत काढण्यात लाईफ केअर हॉस्पिटलचे नेत्रतज्ज्ञ व कॉर्निया सर्जन डॉ. नदीम खतीब यांना यश आले आहे. डॉ. खतीब यांनी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे व उपचारांमुळे वृद्ध महिलेची दृष्टी वाचली आहे.
आतापर्यंत विविध आजारांसंबंधी अनेक रुग्ण पाहिले आहेत; परंतु, एक विचित्र प्रकार नुकताच समोर आला आहे. येथील डॉ. खतीब यांनी एका महिलेच्या डोळ्यातून चक्क १५ सेंटिमीटरचा जिवंत जंत (अस्कॅरिस लुंब्रिकॉईड्स) शस्त्रक्रिया करून बाहेर काढला आहे. शैला शिंदे (नाव बदललेलं) असे या वृद्ध महिलेचे नाव. तपासणीला येण्यापूर्वी मागील तीन-चार दिवसांपासून त्यांच्या डोळ्याला सूज व तीव्र वेदना जाणवत होत्या. दुखणं वाढल्याने कुटुंबीयांनी या महिलेला येथील लाईफ केअर हॉस्पिटलमधे दाखल केले. नेत्रतज्ज्ञ डॉ. खतीब यांनी दुर्बिणीतून तपासणी केली असता या महिलेच्या उजव्या डोळ्यात मोठा जंत (अस्कॅरिस लुंब्रिकॉईड्स) असल्याचं निदान झालं. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. त्यानुसार डॉ. खतीब यांनी तातडीने शस्त्रक्रिया करून महिलेच्या डोळ्यातून जिवंत जंत (अस्कॅरिस लुंब्रिकॉईड्स) बाहेर काढला. या शस्त्रक्रियेनंतर महिलेचं दुखणं कायमस्वरूपी दूर झालं आहे.
डॉ. खतीब म्हणाले, या महिलेला उपचारासाठी आणले तेव्हा त्यांच्या डोळ्यात वेदना होत होत्या, डोळा लाल दिसत होता. अशा स्थितीत महिलेच्या डोळ्याची वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय चाचणीत महिलेच्या डोळ्यात जंत असल्याचं समोर आले. याला वैद्यकीय भाषेत अस्कॅरिस लुंब्रिकॉईड्स असे म्हणतात. शस्त्रक्रिया करून हा जंत काढणं गरजेचं होतं. त्यानुसार कुटुंबीयांच्या परवानगीने शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेत डोळ्यातील आतील खालच्या बाजूला लहानशी चीर देऊन हा जंत काढण्यात आला. साधारणतः १५ सेंटीमीटरचा हा जंत होता. या शस्त्रक्रियेनंतर महिलेची डोळ्याच्या दुखण्यातून सुटका झाली आहे. अस्कॅरिस लुंब्रिकॉईड्स हा जंत साधारणपणे खाण्यातून पोटात जाऊन तिथे अंडी घालतो आणि रक्तवाहिन्यांवाटे तो शरीराच्या कोणत्याही भागात पोहोचू शकतो. मेंदू, डोळा अशा ठिकाणी अशाप्रकारे जंत आढळणे क्वचितच घडते; परंतु असे झाल्यास हा वर्म डोळ्यांना इजा पोहोचवतो.