फासकीत अडकलेल्या बिबट्याला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फासकीत अडकलेल्या बिबट्याला जीवदान
फासकीत अडकलेल्या बिबट्याला जीवदान

फासकीत अडकलेल्या बिबट्याला जीवदान

sakal_logo
By

ratchl244.jpg ः
85068
चिपळूणः बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडताना वनविभागातील बचाव पथकाचे अधिकारी.
----------------
फासकीत अडकलेल्या बिबट्याला जीवदान
दळवटणेतील घटना; नर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडले
चिपळूण, ता. २४ः तालुक्यातील दळवटणे भुवडवाडी येथील शेतात फासकीमध्ये अडकलेल्या बिबट्याला अवघ्या अर्ध्या तासात सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाच्या बचाव पथकाला यश आले. बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
तालुक्यातील दळवटणे भुवडवाडी येथील संतोष भुवड आणि धोंडू भुवड यांच्या शेतीमध्ये फासकीत बिबट्या अडकला असल्याची माहिती संदीप यशवंत सुगदरे यांनी दूरध्वनीद्वारे वनविभागला दिली होती. ही माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे बचाव पथक रेस्क्यूसाठी आवश्यक साहित्यासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
या बिबट्याला काही वेळातच सुखरूप बाहेर काढण्यात आलं. फासकीमध्ये अडकलेल्या बिबट्याला बाहेर काढल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पिसे यांनी त्याची पाहणी केली. हा बिबट्या नर जातीचा असून, त्याचं अंदाजे वय साडेतीन वर्ष आहे. तो सुस्थितीत असल्याचे डॉ. पिसे यांनी सांगितले. त्यानंतर या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याबाबतचा त्यांनी अहवाल दिला. त्यानुसार वनविभागाच्या बचाव पथकाने या बिबट्याला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केल.
वनविभागाच्या बचाव पथकामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री कीर, वनरक्षक दत्ताराम सुर्वे, राजाराम शिंदे, कृष्णा इरमले, वाहनचालक नंदकुमार कदम यांच्या बचावपथकाने धाडसाने बिबट्याला केवळ अर्ध्या तासातच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जाळीतून बाहेर काढले. या बचाव पथकाला विभागीय वनाधिकारी चिपळूण दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांचे मार्गदर्शन मिळाले.