‘आंबेडकर स्वाधार’साठी १० मार्च पर्यंत मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आंबेडकर स्वाधार’साठी
१० मार्च पर्यंत मुदतवाढ
‘आंबेडकर स्वाधार’साठी १० मार्च पर्यंत मुदतवाढ

‘आंबेडकर स्वाधार’साठी १० मार्च पर्यंत मुदतवाढ

sakal_logo
By

‘आंबेडकर स्वाधार’साठी
१० मार्च पर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी, ता. २४ ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरण्यासाठी १० मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्याच्या ठिकाणांच्या महाविद्यालयातील अनुचुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील गरजू विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हाच्या ठिकाणातील हद्दीपासून ५ किलोमीटर परिसरात असलेल्या महाविद्यालयातील ११ वी व १२ वी तसेच ११ वी व १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑफलाईन (मॅन्युअली) पध्दतीने वाटप व स्विकृती करण्याची मुदतवाढ १० मार्चअखेर करण्यात येत आहे. या विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयात व या कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या वसतिगृहात विनामूल्य उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग या कार्यालयाकडे संपर्क साधावा.
--
तळेरे-घाडीवाडीत
आज विविध कार्यक्रम
तळेरे, ता. २४ ः घाडीवाडी येथील श्री गांगेश्वर मित्रमंडळाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त उद्या (ता.२३) विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या सकाळी आठला श्री. गांगेश्वर बालमित्रमंडळ तळेरे घाडीवाडी यांचे ढोल वादन, नऊला सत्यनारायण महापुजा, त्यानंतर आरती व तिर्थप्रसाद, दुपारी एक ते तीन महाप्रसाद, ३ ते ६ हळदीकंकू व विविध खेळ, त्यानंतर विविध सुश्राव्य भजने सादर होतील. रात्री साडेदहाला काका गोसावी प्रस्तुत ओंकार दशावतार मंडळ म्हापण यांचे महान पौराणिक दशावतार नाटक ‘अश्रुंची झाली फुले’ हे नाटक सादर होईल. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
-------------
धान्य खरेदीसाठी
२८ पर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी, ता. २४ ः जिल्ह्यामध्ये शासकीय आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोव्हेंबर २०२२ पासून एकूण ३९ धान खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरू असून शासनाकडुन धान खरेदीसाठी २८ पर्यंत अंतीम मुदतवाढ दिली आहे. शासनकाडून धान्य खरेदीची मुदत १५ फेब्रुवारीअखेर देण्यात आलेली होती. शासनाकडुन यापुढे धान्य खरेदीस मुदतवाढ मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी धान्य खरेदी केंद्रावर नोंदणी केली आहे, त्यांनी तातडीने आपले धान्य खरेदी केंद्रावर विक्री करावे, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल देसाई यांनी केले आहे.