बांद्यात ''शरीरसौष्ठव''ला उत्स्फुर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांद्यात ''शरीरसौष्ठव''ला उत्स्फुर्त प्रतिसाद
बांद्यात ''शरीरसौष्ठव''ला उत्स्फुर्त प्रतिसाद

बांद्यात ''शरीरसौष्ठव''ला उत्स्फुर्त प्रतिसाद

sakal_logo
By

85097
बांदा ः बांदेश्वर फिटनेस क्लब मेन फिजिक्सच्या विजेत्यांसह मान्यवर. (छायाचित्र - नीलेश मोरजकर)

बांद्यात ‘शरीरसौष्ठव’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

बांदेश्वर फिटनेस क्लबतर्फे स्पर्धा; ‘दबीएफसी’चा वायंगणकर, ‘मेन फिजिक्स’चा सरवंजे विजेता

बांदा, ता. २४ ः येथील बांदेश्वर फिटनेस क्लबतर्फे येथे आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव व मेन फिजिक्स स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. द. बी. एफ. सी क्लासिकचा खिताब फोंडाघाट येथील योगेश वायंगणकर याने मिळवला. मेन फिजिक्स स्पर्धेचे विजेतेपद फोंडाघाट येथील गणेश सरवंजे याने पटकावले. ओरोस येथील प्रथमेश पारकर याला बेस्ट पोझर तर गणेश सातार्डेकर याला मोस्ट इंप्रुव्हडचे पारितोषिक देण्यात आले.
बांदा ओवेस कॉम्प्लेक्स येथे आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन भाजयुमो जिल्हाध्यक्ष भाई सावंत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी व्यासपीठावर बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतिब, माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगांवकर, माजी सभापती शितल राऊऴ, बांदा ग्रामपंचायत सदस्य आबा धारगऴकर, बाळू सावंत, रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर, श्याम मांजरेकर, दीपलक्ष्मी सावंत-पटेकर, तनुजा वराडकर, तांबुळीचे माजी सरपंच अभिलाष देसाई, बांदेश्वर फिटनेस क्लबचे मालक संदेश सावंत आणि तेजस कीर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन तसेच बजरंगबली हनुमान व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमांना वंदन करण्यात आले. स्पर्धेचे पंच म्हणून आशिष वर्तक, श्रबुर सावंत यांनी काम पाहीले. सुत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले. मान्यवरांचे स्वागत तेजस कीर, आभारप्रदर्शन संदेश सावंत यांनी केले.
स्पर्धेचा गट निहाय निकाल असा ः ५५ किलो वजनी गट - प्रथम - राजेंद्र बंडवे (गियर अप कुडाऴ), द्वितीय -विपुल करलकर (एम्पायर कुडाळ), तृतिय - आनंद राऊऴ (एम्पायर कुडाळ), चतुर्थ - प्रथमेश पारकर (ओरोस गंगाई), पंचम - हरिश राज ( एम्पायर कुडाळ). ६० किलो वजनी गट - प्रथम - सागर काळप (एम्पायर कुडाळ), द्वितीय - ओम सावंत ( शिवाजी फिटनेस सावंतवाडी), तृतीय - समीर मामलेकर (यश फिटनेस), चतुर्थ - शंकर माने (पावर हाऊस कणकवली), पंचम - हितेंद्र कदम (बांदेश्वर फिटनेस क्लब, बांदा). ६५ किलो वजनी गट - प्रथम-अमित माळकर (टीम शिवाजी सावंतवाडी, द्वितीय-ज्ञानेश्वर आळवे (गियर अप कुडाऴ), तृतीय - सहदेव नार्वेकर (शिरोडा जिम), चतुर्थ -भुषण खोत (द फिटनेस वॉरियर्स ,मालवण), पंचम -योगेश मेस्त्री (फायु फँक्टर्स). ७० किलो वजनी गट - प्रथम - गणेश सातार्डेकर (द फिटनेस मालवण), द्वितीय -गणेश सरवांजे (द फ्युचर फिट फोंडाघाट), तृतीय - प्रितम शिंदे (द फिटनेस), चतुर्थ - नितिन सावंत (एम्पायर कुडाळ), पंचम - धनेश मेस्त्री (भगिरथ जीम). ७० किलोवरील गट- प्रथम - योगेश वायंगणकर (फ्युचर फीट, फोंडाघाट), द्वितीय - धर्मपाल जाधव (गावडे फिटनेस, तळवडे), तृतीय - विपुल घोगळे (एस.आर.के.जीम,कलमठ), चतुर्थ - बंटी सारंग (फिटनेस वॉरियर्स). मेन फिजिक्स स्पर्धा अनुक्रमे ः गणेश सरवंजे (फ्युचर फिट फोंडाघाट), ओम सावंत (टिम शिवाजी सावंतवाडी), वेदार्श मल्हार (युनिव्हर्सल फिटनेस सावंतवाडी), भुषण खोत (द फिटनेस वॉरियर्स मालवण), शंकर माने (पॉवर हाऊस कणकवली), ज्ञानेश्वर आळवे (गियरअप कुडाळ), ओमकार केसरकर (फ्युचर फिट फोंडाघाट), अमित माळकर (टिम शिवाजी सावंतवाडी), प्रज्योत सातार्डेकर (सोन्सुरकर शिरोडा), हितेंद्र कदम (बांदेश्वर फिटनेस क्लब बांदा).