आरोग्यसेवा उपक्रम कौतुकास्पद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्यसेवा उपक्रम कौतुकास्पद
आरोग्यसेवा उपक्रम कौतुकास्पद

आरोग्यसेवा उपक्रम कौतुकास्पद

sakal_logo
By

85199
सावंतवाडी ः भीमगर्जना बौद्ध मंडळातर्फे आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्‍घाटन प्रसंगी गोविंद वाडकर आदी.

आरोग्यसेवा उपक्रम कौतुकास्पद

गोविंद वाडकर; सावंतवाडीतील शिबिराचा ७५ जणांना लाभ

सावंतवाडी, ता. २५ ः रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला आरोग्य शिबिर घेणे ही भीमगर्जना बौद्ध मंडळांची कौतुकास्पद कामगिरी आहे. त्यामुळे गरीब, गरजूंना या शिबिराचा लाभ घेता आला, असे गौरवोद्गार आरोग्य शिबिराच्या उद्‍घाटन प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर यांनी काढले.
येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे शिवजयंतीनिमित्त भीमगर्जना बौद्ध मंडळांने आरोग्य शिबिर आयोजित केले. यावेळी वाडकर बोलत होते. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माजी उपनगराध्यक्ष वाडकर यांनी पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर बुद्ध वंदना झाली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मंगेश कदम यांनी सर्व डॉक्टर व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. प्रास्ताविकात ते कदम यांनी राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या साह्याने इतिहास घडविला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लेखणीच्या आधारे भारत देशाला संविधान दिले, असे सांगून मंडळाच्या कार्याचा धावता आढावा घेतला. डॉ. रवी गोलघाटे यांनी मंडळाने घेतलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले. आरोग्य शिबिर गरीब व होतकरू लोकांच्या फायद्याचे आहे, असे त्यांनी सांगितले. मंडळाने यासाठी पुढाकार घेतल्याबाबत त्यांनी कौतुक केले. डॉ. भाग्यश्री विठ्ठलानी यांनी स्त्री रोग व आरोग्य तपासणीसारखी आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल मंडळाला धन्यवाद दिले. डॉ. विठ्ठलानी, डॉ. कढाणे, डॉ. प्रणाली नागदिवे व ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव यांची शुभेच्छापर भाषणे झाली. या आरोग्य शिबिरामध्ये डॉ. गोलहाटे, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. विकास कटाने, डॉ. ललित विठ्ठलानी, डॉ. नागदिवे, डॉ. भाग्यश्री विठ्ठलानी यांनी सहकार्य केले. शिबिरामध्ये आरोग्य व हिमोग्लोबिन तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली. शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष कदम, सचिव प्रवीण कांबळे, ललिता कांबळे, सुरेश कांबळे, दया जाधव, धोंडी अनस्कर, निवेद कांबळे, सुरेश कांबळे, मीनाक्षी पवार, हेमंत कांबळे, लवेश पवार, मानसी कदम, जयश्री पाटणकर, ज्योती जाधव, वर्षा कदम, विशाखा कांबळे, शिवानी कांबळे, नारायण जाधव, शुभांगी कांबळे यांनी सहकार्य केले. शिबिरास अॅड. अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक विलास जाधव यांनी भेट देऊन सहकार्य केले. सचिव प्रवीण कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. मानसी कदम यांनी आभार मानले. या आरोग्य शिबिराचा ७५ जणांनी लाभ घेतला.