विज्ञानातून करिअर संधी-- 1 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विज्ञानातून करिअर संधी-- 1
विज्ञानातून करिअर संधी-- 1

विज्ञानातून करिअर संधी-- 1

sakal_logo
By

rat२५३.txt

बातमी क्र.. ३ ( पान ५ अॅंकर)

फोटो ओळी
-rat२५p४.jpg-
८५१५९
रत्नागिरी ः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत प्रयोग करताना विद्यार्थी.
---

विज्ञानातील संधी---भाग १ ........... लोगो

वैज्ञानिक दृष्टिकोन बालवयातच मुलांमध्ये रुजवला पाहिजे. नाहीतर विज्ञान तंत्रज्ञानाचा जगण्यात वापर, मात्र वृत्ती सनातनी. पर्यायाने समाजात वावरही सनातनी, अशा पद्धतीने वर्तणूक होण्याचा धोका असतो. सरकारने वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होण्यासाठी विद्यार्थ्यांकरिता अनेक कवाडे खुली केली आहेत. खगोल विज्ञान, तंत्रज्ञान, मूलभूत विज्ञान आणि या सर्वासाठी प्राथमिक स्तरावरही आवश्यक असणाऱ्या प्रयोगशाळा अशी जय्यत तयारीही करून देण्याची सरकारची, काही संस्थांची तयारी आहे. मुलांना प्रयोगशाळा उपलब्ध झाल्या नाहीत, तर त्यांच्या दारी प्रयोगशाळा नेण्याचीही तयारी आहे. अशा स्थितीत खगोलशास्त्र, विज्ञान, गणित यामध्ये मुलांना अनेक संधीही आहेत. प्रयोगशाळा असल्या, तरी त्या प्राथमिक शाळेतील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षकांचीही मानसिकता असणे आवश्यक आहे. या साऱ्याचे चित्र काय आहे, त्याचा आढावा घेणारी मालिका आजपासून..

मकरंद पटवर्धन, रत्नागिरी
---

विज्ञानातील संधींची माहिती शालेय जीवनातच हवी

आठवी ते बारावीसाठी नॅशनल स्टॅंडर्ड एक्झाम ; ऑलिंपियाडमध्ये संधी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः आज जगभरात विज्ञानविषयक संशोधनाच्या व अभ्यासाच्या अनेकविध संधी उपलब्ध आहेत; परंतु त्याची माहिती शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना देण्याची आवश्यकता आहे. इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स ही संस्था आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी देशभरात नॅशनल स्टॅंडर्ड एक्झाम घेते. त्या माध्यमातून पाच-सहा विद्यार्थ्यांना पुढे संधी मिळते. एनसीआरटी, जेईई, एनईईटीच्या अभ्यासक्रमावर आधारित या परीक्षा अवघड असतात. या परीक्षेला रत्नागिरीतून प्रतिवर्षी ४० विद्यार्थी बसत आहेत. यात अजूनही वाढ होण्याची गरज आहे.
गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र, ज्युनियर सायन्स आणि गणित या विषयांवर ही परीक्षा होत असते. या परीक्षेचे आयोजन रत्नागिरीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा भौतिकशास्त्र विभाग करतो. या परीक्षेविषयी प्रा. विवेक भिडे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात परीक्षा होते. जवाहर नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालयाप्रमाणे गोगटे कॉलेजमध्येही ही परीक्षा होते. राष्ट्रीय परीक्षा देताना भरपूर अभ्यास करावा लागतो. या परीक्षांचा उपयोग विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणातही होत असतो. या परीक्षेतून ३५ विद्यार्थ्यांची निवड होते. त्यांचे तीन आठवड्यांचे प्रशिक्षणातून पाच-सहाजणांची निवड होते. त्यांचे पूर्व ऑलिंपियाड शिबिर होते. हे पाच विद्यार्थी, दोन निरीक्षक, दोन लिडर यांची टीम पुढील जुलैमध्ये होणाऱ्या ऑलिंपियाडमध्ये सहभागी होते.
ऑलिंपियाडमध्ये भौतिकशास्त्रात भारताने यापूर्वी चांगले यश मिळवले आहे. स्वित्झर्लंडमध्ये गतवर्षी झालेल्या या परीक्षांसाठी प्रा. भिडे यांनी ऑनलाईन भाग घेऊन टीमला प्रोत्साहन दिले होते. त्या वेळी भारतीय संघाला सुवर्ण व रौप्यपदके मिळाली. भारताला यापूर्वी २०१५ भौतिकशास्त्र ऑलिंपियाड व २०१७ मध्ये खगोलशास्त्र ऑलिंपियाड भरवण्याचा मान मिळाला आहे. रत्नागिरीतील एका विद्यार्थ्याला ऑलिंपियाडच्या संघात सहभागी होण्याची संधी मिळाली होती. या स्टॅंडर्ड एक्झॅमला बसण्यासाठी ऑनलाइन अथवा गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागात संपर्क साधावा. किमान १०० ते १५० विद्यार्थ्यांनी यात भाग घ्यावा, असे आवाहन प्रा. भिडे यांनी केले आहे.


भौतिकशास्त्र शिका

गोगटे महाविद्यालयात आज कम अॅंड लर्न फिजिक्स या उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये शिर्के प्रशाला, जीजीपीएस आणि जांभेकर विद्यालयातील १०० विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत जाऊन विविध प्रयोग जाणून घेतले आहेत. हे प्रयोग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दाखवले. भौतिकशास्त्र व विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी हा उपक्रम गेली अनेक वर्षे आयोजित केला जात आहे.