रेखाचित्र शाखा कर्मचाऱ्यांना न्याय देऊ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेखाचित्र शाखा कर्मचाऱ्यांना न्याय देऊ
रेखाचित्र शाखा कर्मचाऱ्यांना न्याय देऊ

रेखाचित्र शाखा कर्मचाऱ्यांना न्याय देऊ

sakal_logo
By

85262
कुडाळ ः महाराष्ट्र राज्य रेखाचित्र संघटनेचे अध्यक्ष जा. की. जाफरी यांचे स्वागत करताना जिल्हाध्यक्ष राजू तावडे, सचिव प्रसाद कापडोसकर. सोबत सुधीर गव्हाणे, वाल्मिक दारुणकर, प्रशांत कहाते, एम. ए. रहीम, तुकाराम कुमठेकर आदी.


रेखाचित्र शाखा कर्मचाऱ्यांना न्याय देऊ

जा. की. जाफरी ः जिल्हा संघटनेतर्फे कुडाळात स्वागत

सावंतवाडी, ता. २५ ः पाचव्या वेतन आयोगातील त्रुटींमुळे प्रलंबित असलेली १९९६ ते २००६ या कालावधीतील वेतनाची थकबाकी वन विभागाच्या रेखाचित्र शाखेतील कर्मचाऱ्यांना मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रेखाचित्र कर्मचारी संघटना निश्चित प्रयत्न करेल, अशी ग्वाही संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष जा. की. जाफरी यांनी कुडाळ येथे दिली. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने १४ मार्चला पुकारलेल्या संपात रेखाचित्र संघटनेच्या सभासदांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र राज्य रेखाचित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जाफरी, सचिव सुधीर गव्हाणे, प्रमुख सल्लागार वाल्मिक दारुणकर, विभागीय सचिव प्रशांत कहाते, एम. एम. रहीम हे काल (ता. २४) कुडाळ येथे आले होते. यावेळी रेखाचित्र संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजू तावडे, सचिव प्रसाद कापडोसकर, वन विभागाचे सेवानिवृत्त आरेखक तुकाराम कुमठेकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी वनखात्याच्या रेखाचित्र कर्मचाऱ्यांना अद्याप १९९६ ते २००६ या कालावधीतील वेतनाची थकबाकी मिळाली नसल्याचे रेखाचित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. ही वेतन थकबाकी केवळ कृषी विभागास मिळाली होती. महाराष्ट्र राज्य रेखाचित्र संघटनेने याबाबत महाराष्ट्र प्राधिकरण न्यायालयात दावा दाखल करून पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व मृदू संधारण विभागातील रेखाचित्र शाखेच्या कर्मचाऱ्यांनाही या वेतनाची थकबाकी मिळवून दिली. त्याच धरतीवर आपण वन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना ही थकबाकी मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, अशी ग्वाही जाफरी यांनी दिली. याबाबत लवकरच वन विभागातील रेखाचित्र कर्मचाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.