सौरव के. पी., सुफिया शेखचे जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सौरव के. पी., सुफिया शेखचे 
जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत यश
सौरव के. पी., सुफिया शेखचे जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत यश

सौरव के. पी., सुफिया शेखचे जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत यश

sakal_logo
By

सौरव के. पी., सुफिया शेखचे
जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत यश

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ ः छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त एफ. एस. बॅडमिंटन अॅकॅडमी ऑफ सिंधुदुर्ग आणि सिंधुरत्न बॅडमिंटन असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने एफ. एस. बॅडमिंटन हॉल, कुडाळ येथे आयोजित भव्य जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात सौरव के. पी., तर मुलींच्या गटात सुफिया शेख यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले.
गटनिहाय विजेते व उपविजेते असे ः ११ वर्षांखालील मुले-सक्षम म्हापसेकर (वेंगुर्ले), ऋषांक कुलकर्णी (कुडाळ). १३ वर्षांखालील मुले-स्वामीसमर्थ बगडे (कुडाळ), गौरव पराडकर (मालवण), १५ वर्षांखालील मुले-मोहित कांबळे (कणकवली), शिवम नागराज (सावंतवाडी), १७ वर्षांखालील मुले-सौरव के. पी. (मालवण), मोहित कांबळे (कणकवली), १९ वर्षांखालील मुले-सौरव के. पी. (मालवण), श्रेयस चव्हाण (कुडाळ). ११ वर्षांखालील मुली-स्वरा कोळी (कुडाळ), विहानी शिंदे (कुडाळ), १३ वर्षांखालील मुली-शरयू चुबे (कुडाळ), गौराई बोडेकर (सावंतवाडी), १५ वर्षांखालील मुली-सुफिया शेख (कुडाळ), शरयू चुबे (कुडाळ), १७ वर्षांखालील मुली-सुफिया शेख (कुडाळ), मैथिली ठाकूर (कुडाळ), १९ वर्षांखालील मुली -सुफिया शेख (कुडाळ), तबस्सूम शेख (कुडाळ) यांनी यश मिळविले.