भाजपचे बुथ सशक्तीकरण अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपचे बुथ सशक्तीकरण अभियान
भाजपचे बुथ सशक्तीकरण अभियान

भाजपचे बुथ सशक्तीकरण अभियान

sakal_logo
By

85381
कुडाळ ः भाजपच्या बुथ सशक्तीकरण अभियान जिल्हास्तर प्रशिक्षण बैठकीस उपस्थित पदाधिकारी.

भाजपचे बुथ सशक्तीकरण अभियान

कुडाळात बैठक; विविध विषयांवर चर्चा

कुडाळ, ता. २६ ः सिंधुदुर्ग जिल्हा भाजपची बुथ सशक्तीकरण अभियानाची बैठक काल (ता. २५) कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी मंडल प्रशिक्षण वर्ग तसेच शक्ती केंद्र विस्तारक व बुथ समिती सदस्यांच्या बैठकी तसेच शक्ती केंद्र अल्पकालीन विस्तारकांच्या दहा दिवसांच्या विस्तारक कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन केले. मंडल प्रशिक्षण वर्गाच्या विषयाबद्दल माहिती देण्यात आली.
या बैठकीस महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, प्रज्ञा ढवण, राजश्री धुमाळे, दादा बेळणेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, अशोक सावंत, मनोज रावराणे, जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, नाथा नाडकर्णी, राजन चिके, जिल्हा प्रवक्ते संजू परब, बाबा मोंडकर, जिल्हा चिटणीस मनोज नाईक, नीलेश सामंत, अनुसूचित जाती मोर्चाचे चंद्रकांत जाधव, मंदार कल्याणकर, चारुदत्त देसाई, राजेंद्र म्हापसेकर, शिक्षक आघाडीचे सुरेश चौकेकर, प्रमोद कामत, प्रकाश राणे, संजय वेंगुर्लेकर, बंड्या सावंत, मंडल अध्यक्ष विनायक राणे (कुडाळ), दादा साईल (ओरस), अजय गोंधावळे (सावंतवाडी), रवींद्र मडगावकर (आंबोली), महेश धुरी (बांदा), सुधीर दळवी (दोडामार्ग), श्री. कानडे (कणकवली), संतोष किंजवडेकर (देवगड), अमोल तेली (पडेल), विजय केनवडेकर (मालवण), जिल्हा कार्यालयीन मंत्री समर्थ राणे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख समीर प्रभुगावकर, महेश मांजरेकर, मधुकर देसाई, विनोद सावंत आदी उपस्थित होते.