शिरोडावासीयांची व्यापाऱ्यांसाठी एकजूट

शिरोडावासीयांची व्यापाऱ्यांसाठी एकजूट

85382
शिरोडा ः नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना विशाल सेवा फाउंडेशनकडून देण्यात आलेली आर्थिक मदत व्यापारी संघ अध्यक्षांकडे सुपूर्द करताना प्रीतेश राऊळ, मनोज उगवेकर आदी.


शिरोडावासीयांची व्यापाऱ्यांसाठी एकजूट

नुकसानग्रस्तांना मदत; व्यापारी संघटनेकडे सात लाख सुपूर्द

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २६ ः शिरोडा बाजारपेठ येथे शुक्रवारी (ता. २४) आग लागून व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना शिरोडावासीयांनी सामाजिक बांधिलकीतून एकत्र येत मदतीचा हात दिला आहे. शिरोडा येथील श्री माऊली सभागृहात पंचक्रोशीतील व्यापारी, ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांच्या झालेल्या सभेत उपस्थित व्यापारी व ग्रामस्थांकडून सुमारे ७ लाखांपेक्षा जास्त आर्थिक मदत शिरोडा व्यापारी संघटनेकडे जमा झाली.
नुकसानग्रस्तांना मदत मिळावी काल (ता. २५) दुपारी सर्व बाजारपेठ बंद ठेवून या सभेचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, शिरोडा शहर भाजपकडून केलेल्या पाठपुराव्यामुळे विशाल सेवा फाउंडेशनचे उद्योजक तथा भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्याकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत त्याचबरोबर प्रत्येक उपस्थित भाजप, पदाधिकाऱ्यांनी आपली वैयक्तिक आर्थिक मदत शिरोडा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजन शिरोडकर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी भाजपचे रेडी जिल्हा परिषद सदस्य प्रीतेश राऊळ, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, माजी सरपंच मनोज उगवेकर, माजी उपसरपंच राहुल गावडे, विद्यमान सदस्य मयुरेश शिरोडकर, हेतल गावडे, अर्चना नाईक, रेडी सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच नमिता नागोळकर, आरवली ग्रामपंचायत सरपंच तातोबा कुडव, उपसरपंच रिमा मेस्त्री, भाजप शहराध्यक्ष श्रीकृष्ण धानजी, उपाध्यक्ष संतोष अणसूरकर, शहर ज्येष्ठ पदाधिकारी अनिल गावडे, चंद्रशेखर गोडकर, शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख विद्याधर धानजी आदी उपस्थित होते. यावेळी नुकसानग्रस्तांना शासन स्तरावर नुकसान मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन प्रीतेश राऊळ यांनी दिले. बाजारपेठेतील नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांसाठी ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि व्यापारी बांधवांनी सामाजिक बांधिलकीतून घेतलेल्या या पुढाकाराने एक आदर्श निर्माण केला असून शिरोडावासीयांच्या या एकजुटीचे कौतुक केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com