पावस-पावस बाजारपेठेत ट्रकमधील गवताला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-पावस बाजारपेठेत ट्रकमधील गवताला आग
पावस-पावस बाजारपेठेत ट्रकमधील गवताला आग

पावस-पावस बाजारपेठेत ट्रकमधील गवताला आग

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat26p24.jpg-Id: KOP23L85443 पावस ः मच्छीमार्केटजवळ हॉटेल स्वरूपजवळ वायर लागल्याने गवताला लागलेली आग पंपाच्या पाण्याने आटोक्यात आणताना ग्रामस्थ.
----------
पावस बाजारपेठेत ट्रकमधील गवताला आग
पावस ः पावस बाजारपेठेतून आंब्यासाठी लागणारे गवत ट्रकमधून येत असताना बाजारपेठेमध्ये सर्विस वायर लागल्याने झालेल्या आगीमध्ये गवताने पेट घेतला. प्रसंगावधान राखून चालकाने तातडीने जवळच असलेल्या मोकळ्या जागेत ट्रक वळवल्याने तेथील पंपाच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले.
रविवारी (ता.२६) दुपारी साडेबाराच्या दरम्यान मोहसीन काझी यांचा ट्रक आंबा भरण्यासाठी लागणारे गवत ट्रक भरून घेऊन जात होता. त्यावेळी पावस मच्छीमार्केटजवळील हॉटेल स्वरूप येथे सर्विस वायर गवताला लागल्याने स्पार्किंग होऊन ट्रकमधील गवताने पेट घेतला. ही गोष्ट चालकाच्या लक्षात येताच त्याने ट्रक मोकळ्या जागेत नेला आणि तिथे असलेल्या पंपाच्या पाण्याच्या आग आटोक्यात आणली. त्यामुळे ट्रकच्या नुकसान झाले नाही.