सहाव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहाव्या मजल्यावरून
पडून कामगाराचा मृत्यू
सहाव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

सहाव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

sakal_logo
By

सहाव्या मजल्यावरून
पडून कामगाराचा मृत्यू

कुडाळात इमारतीच्या कामावेळी घटना

कुडाळ, ता. २६ ः शहरातील नाबरवाडी येथे सहा मजली इमारतीवरुन काम करत असताना तोल जाऊन पडल्याने कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बनवारी परशुराम सहानी (वय १८, मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. कुडाळ रेल्वे स्टेशननजिक), असे मृताचे नाव आहे. ही घटना आज सायंकाळी घडली.
येथील नाबरवाडी ते एमआयडीसीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर सध्या कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू आहे. पाच मजल्यापर्यंत हे बांधकाम झाले असून सहाव्या मजल्यावर काँक्रीट टाकण्यासाठी सेंट्रींगच्या फळ्या ठोकण्याचे काम सुरू होते. हे काम बनवारी करत होता. त्याने कोणत्याही प्रकारची सुरक्षितता बाळगली नव्हती. दरम्यान, काम करत असताना त्याचा तोल गेला व जमिनीवर कोसळला. हा प्रकार लक्षात येताच त्याच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना समजतात कुडाळतील सर्व मजूर ग्रामीण रुग्णालयात जमा झाले होते. याबाबत येथील पोलिस ठाण्यात नोंद झाली. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, श्री. तांबे यांनी पंचनामा केला.