
देवडे मंदिरात सीसी टीव्ही
देवडे मंदिरात
सीसी टीव्ही
साखरपाः प्रशासनाच्या आदेशानुसार देवडे गावातील सोमलिंग मंदिर येथे सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले. देवडे गावाचे गावकर डॉ. शशिकांत चिंचवलकर, मानकारी, ग्रामस्थांनी त्वरित निर्णय घेऊन मंदिरातील होणाऱ्या चोर्या, मोडतोड याला आळा बसावा म्हणून सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला. या वेळी देवडेचे डॉ. शशिकांत चिंचवलकर, सरपंच राजेश राणे, आत्माराम चिंचवलकर, दयानंद चिंचवलकर, रूपेश माईल, काशिराम चाचे, हरिश्चंद्र चिंचवलकर, रमेश देवजी चिंचवलकर, चन्द्रकांत चिंचवलकर उपस्थित होते.
-------
सात मार्चपासून
जादा बसेस
खेडः शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकातून 6 ज्यादा बसेस चालवण्याचे नियोजन येथील एसटी प्रशासनाने केले आहे. या जादा बसेस 7 ते 12 मार्च या कालावधीत धावणार आहेत. सकाळी 9.30 वाजता खेड- बोरीवली, 10.15 वाजता खेड-शिवतर-बोरिवली, 10.30 वाजता खेड-भांडूप, दुपारी 2 वाजता पन्हाळजे-मुंब्रा-ठाणे बसफेऱ्यांचा समावेश असून या चार या- बसफेऱ्या 7 मार्चपासून धावतील. सकाळी 8.30 वाजता तुळशी-विरार, 11 वाजता खेड- तुळशी-विठ्ठलवाडी या बसफेऱ्या 1 मार्चपासून धावणार आहेत. प्रवाशांनी बसफेऱ्यांचा लाभ घेण्याचे आवाहन आगाराच्यावतीने केले आहे.
------------
अभाविपतर्फे
आज युवा शिबिर
रत्नागिरीः जिल्ह्यात प्रथमच मंगळवारी (ता. 28) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे जिल्हास्तरीय युवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनाला उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. या शिबिरामध्ये विविध विषयांवर नामांकित वक्ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यात ग्रामीण अर्थव्यवस्था व रोजगाराच्या संधी या विषयावर अमुल डेअरीचे रूपेश चंदनशिव मार्गदर्शन करतील. कोकणातील व्यावसायिकता या विषयावर चितळे ग्रुपचे विश्वास चितळे, स्टार्टअप् विषयावर बुक गंगा डॉट कॉमचे सीईओ मंदार जोगळेकर मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री अंकिता पवार या लोकशाहीत युवकांचे योगदान यावर भाषण करणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यावर एक चर्चासत्रही होणार असून प्रा. भूषण भावे मार्गदर्शन करणार आहेत.
------
युवा जल्लोष
डान्स स्पर्धा
मंडणगडः आमदार योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या वतीने आयोजित युवा जल्लोष ही डान्स स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या क्रीडांगणांवर झाली. याप्रसंगी आमदार कदम यांच्या हस्ते शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, मंडणगड याचे जिल्हा प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते विविध गावातील नवनिर्वाचित सरपंचांना सन्मानित करण्यात आले. आमदार कदम यांनाही सन्मानित करण्यात आले आणि केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित स्पर्धेत पहिली ते सहावी गटात लहान गटामध्ये श्रावणी महाडीक, सिमरन जाधव, समृद्धी खैरे यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. सातवी ते खुला गटामध्ये अनुक्रमे पारितोषिक श्रावणी पोस्टुरे, तृषा माळी, दीप्ती येलवे यांनी क्रमांक मिळवले. सांघिक खुला गटात प्रथम पारितोषिक वारकरी नृत्यासाठी नूतन विद्यामंदिर, द्वितीय पारितोषिक विभागून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या तांडव नृत्य आणि पवार ब्रदर यांना, तृतीय पारितोषिक तुळशी न्यू इंग्लिश स्कूलच्या शेतकरी नृत्याला देण्यात आला.