चिपळूण ःपरशुराम घाटाच्या मध्यापर्यंत काँकिटीकरण पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ःपरशुराम घाटाच्या मध्यापर्यंत काँकिटीकरण पूर्ण
चिपळूण ःपरशुराम घाटाच्या मध्यापर्यंत काँकिटीकरण पूर्ण

चिपळूण ःपरशुराम घाटाच्या मध्यापर्यंत काँकिटीकरण पूर्ण

sakal_logo
By

rat27p25.jpg
85630
चिपळूणः परशुराम घाटात कॉंक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे.
ratchl273.jpg-
85631
चिपळूणः दरडीच्या ‘डेंजर झोन’मध्ये संरक्षक भिंतीचे सुरू झालेले काम.
--------------
घाटाच्या मध्यापर्यंत काँकिटीकरण पूर्ण
परशुराम घाटात सरंक्षक भिंतीचे काम सुरू; पावसाळ्यापूर्वी बहुतांशी कामाचा निपटारा
चिपळूण, ता. २७ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. घाटाच्या मध्यापर्यंत काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता अतिशय धोकादायक असलेल्या दरडीच्या ''डेंजर झोन''मध्ये संरक्षक भिंतीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे घाटातील चौपदरीकरण पावसाळ्यापूर्वी बहुतांशी काम मार्गी लावण्याची शक्यता आहे.
महामार्ग चौपदरीकरणात चिपळूण टप्प्यातील परशुराम घाट हा अत्यंत अवघड टप्पा आहे. एकीकडे २२ मिटर उंचीचा डोंगर उतार आणि दुसरीकडे घाटाच्या पायथ्याशी वसलेले पेढे गाव असल्याने येथे डोंगर खोदाईसह अन्य कामे करणे अवघड बनले आहे. तरीदेखील एक मोठे आव्हान स्वीकारण्यात आले आहे. वर्षभरापूर्वी याच घाटात डोंगर खोदाई करताना पोकलेन दरडीखाली सापडून चालकाचा मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर वेळोवेळी खबरदारी घेऊन काम सुरू ठेवण्यात आले.
सर्वप्रथम पायथ्यालगत असलेल्या गावास सुरक्षित करण्यासाठी उताराच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्यात आली. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टी होऊनही कोणताही धोका पेढे गावाला पोहोचला नाही. पेढे-बौद्धवाडी येथील एका घरावर दगड येऊन नुकसान झाले. त्यापलीकडे कोणतीही घटना घडली नाही. पावसाळ्याच्या सुरूवातीला माथ्यावर वसलेल्या परशुराम गावातील डोंगराला भेगा गेल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला होता. त्यानंतर काहीकाळ वाहतुकीसाठी घाट बंद ठेवला होता. मात्र त्यानंतर आजतागायत सर्वप्रकारची वाहतूक सुरू ठेवूनच काम केले जात आहे.
चिपळूण टप्प्यात घाटातील पेढेकडील बाजूने पावणेदोन किमीचा भाग येतो. त्यामुळे डोंगराच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सवतसडा येथे कठीण खडकाचा भाग तोडल्यानंतर तेथून या संरक्षक भिंतीच्या कामाला सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात ४५० मीटर लांबीची आणि सुमारे दहा मीटर उंचीच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण केले. या भिंतीमुळे डोंगराच्या खालील रस्ता सुरक्षित झाला. मात्र आता घाटात अतिशय धोकादायक टप्पा मानला जाणाऱ्या दरडीच्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारली जात आहे. या भिंतीचे काम पूर्ण होताच काँक्रिटीकरणाच्या कामालाही सुरवात केली जाणार आहे.

चौकट
‘टेहरी’चा अहवाल अद्याप गुलदस्त्यात
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील रस्ता पावसाळयात अतिवृष्टीच्या वेळी खचल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे काही महिने घाट वाहतुकीस बंद ठेवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकरने नव्या उपाययोजना राबवण्यासाठी टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (टीएचडीसीएल) ही संस्था नियुक्त केली. या संस्थेने परशुराम घाटाची तातडीने तपासणी केली होती. तसेच याचा अहवाल संस्था केंद्र सरकारला सादर करण्यात येणार होता. मात्र हा अहवाल अद्यापही गुलदस्त्यातच आहे.