सावंतवाडीत विद्यार्थ्यांकडून ‘मी मराठी’चा नारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत विद्यार्थ्यांकडून ‘मी मराठी’चा नारा
सावंतवाडीत विद्यार्थ्यांकडून ‘मी मराठी’चा नारा

सावंतवाडीत विद्यार्थ्यांकडून ‘मी मराठी’चा नारा

sakal_logo
By

85680
सावंतवाडी ः मराठी भाषा दिनानिमित्त कोमसाप सावंतवाडी शाखेतर्फे शहरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी सुधाताई कामत विद्यामंदिरचे विद्यार्थी, कोमसापचे पदाधिकारी.


सावंतवाडीत विद्यार्थ्यांकडून ‘मी मराठी’चा नारा

‘कोमसाप’तर्फे मराठी भाषा गौरव दिन; ग्रंथदिंडीसह विविध घोषणांनी परिसर दणाणला

सावंतवाडी, ता. २७ ः मराठी भाषेबाबत जनजागृती, मराठी भाषा टिकावी व मराठीला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी येथील बाजारपेठेतून ‘मी मराठी’च्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्यावतीने आज कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’चा गजर करत सावंतवाडी गांधी चौकातून संपूर्ण बाजारपेठ ते केशवसुत कट्टापर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात आली. मराठी भाषा टिकवा, नेहमीच्या वाक्प्रचारात इंग्रजीची कास सोडा आणि मराठीच बोला, मराठी मातृभाषेला ज्ञानभाषेचा दर्जा मिळायलाच हवा, असा नाराही देण्यात आला.
या ग्रंथदिंडीत येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ सुधाताई कामत शाळेच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा गजर करत शहर परिसर दणाणून सोडला. गांधी चौकात ग्रंथदिंडीचा प्रारंभ राज्य गीत ''गर्जा महाराष्ट्र माझा'' या राज्यगीताने केला. यावेळी कोमसाप सावंतवाडीचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, डॉ. जी. ए. बुवा, भरत गावडे, ॲड. नकुल पार्सेकर, विनायक गावस, दीपक पटेकर, सुभाष गोवेकर, मेघना राऊळ, मंगल नाईक, रुपेश पाटील, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष नंदू गावडे, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव, शिक्षिका सौ. गवस, सौ. फाले, राजेश जाधव, श्री. देसले, अॅड. लेले, गोकुळी बुवा, रमेश गावडे, किशोर वालावलकर, दत्ता शिंदे आदी उपस्थित होतेय
सावंतवाडी बाजारपेठ ते पालिका या मार्गावरून संपूर्ण बाजारपेठेत मराठीचा जयजयकार करण्यात आला. या ग्रंथदिंडीने सावंतवाडी शहर मराठीमय झाले. मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळा टिकाव्यात, यासाठी घोषवाक्यांद्वारे मराठीचा गजर आळवण्यात आला. ग्रंथदिंडीचा समारोप केशवसुत कट्टा येथे जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलन स्थळी श्रीमंत बापूसाहेब महाराज पुतळ्याजवळ करण्यात आले. अॅड. सावंत यांनी मराठी ही आपली मातृभाषा आहे. तिला ज्ञानभाषा म्हणून दर्जा देण्यात यावा, अशी मागणी केली. याबाबत जनजागृतीसाठी मराठी भाषा चळवळ कायमस्वरूपी उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. अॅड. नकुल पार्सेकर, डॉ. बुवा, सुभाष गोवेकर, राजू तावडे, अभिमन्यू लोंढे, विनायक गावस, दीपक पटेकर, रुपेश पाटील आदी उपस्थित होते.