
कुडाळ, मालवणसाठी 129 कोटी 39 लाख मंजूर
swt२५६.jpg
८५७७८
वैभव नाईक
भूमिगत वीजेसाठी ३५४ कोटी ३९ लाख
वैभव नाईकः कुडाळ, मालवणसाठी १२९ कोटी ३९ लाख मंजूर
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २८ः महाविकास आघाडी सरकारच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन प्रकल्पांतर्गत आरडीएसएस योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात भूमिगत वीज वाहिन्यासाठी ३५४ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. कुडाळ व मालवण तालुक्यासाठी १२९ कोटी ३९ लाख रुपये मंजूर केले आहेत, असे त्यांनी सांगितले.
चक्रीवादळामुळे महावितरणचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. वीज खंडित होऊन नागरिकांना अंधारात रहावे लागते. त्यामुळे सिंधुदुर्गात भूमिगत वीज वाहिन्या करण्यात याव्यात यासाठी खासदार विनायक राऊत यांनी केंद्राकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे तसेच आमदार नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली होता. त्यानुसार महाविकासच्या शिफारसीनुसार राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन प्रकल्पांतर्गत आरडीएसएस योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात भूमिकत वीज महिन्यांसाठी ३५४ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
ते म्हणाले, ‘‘मालवण तालुक्यासाठी ७१ कोटी २९ लाख रुपये मंजूर आहेत. त्यामध्ये १४३ किलोमीटर मते ११ केव्ही लाईन ६८ किलोमीटरमध्ये ३३ केव्ही लाईन १५६ किलोमीटरमध्ये एलटी लाईन भूमिगत टाकण्यात येणार आहे. पेंडूर, कुंभारमाठ, आचरा, विरण, मालवण बाजार, रेवतळे, दांडी, मसुरे, वायंगणी, देवबाग या गावांमध्ये भूमिगत वीज वाहिन्या व त्यासाठी इतर आवश्यक साधनसामग्रीची कामे करण्यात येणार आहेत. कुडाळ तालुक्यात ५८ कोटी १० लाख रुपये मंजूर आहेत. यात आडेली आंदुर्ले ४८ किलोमीटरमध्ये ३३ केव्ही लाईन, चिपी सबस्टेशन अंतर्गत ३०.५ किलोमीटरमध्ये ३३ केव्ही लाईन, पाट २० किलोमीटरमध्ये ११ केव्ही लाईन, चिपी सबस्टेशन अंतर्गत १२ किलोमीटरमध्ये ११ केव्ही लाईन व पाट ८० किलोमीटरमध्ये एलटी लाईन भूमिगत करण्यात येणार आहे. या कामांची निविदा प्रसिद्ध झाली आहे. पाठपुरावा करून लवकरच ही कामे मार्गी लावली जाणार आहेत. इतरही गावांमध्ये भूमिगत वीज वाहिन्या होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.’’