ध्यास विकासाचा, विश्वास चिपळूण -संगमेश्वरकरांचा

ध्यास विकासाचा, विश्वास चिपळूण -संगमेश्वरकरांचा

rat२८१५.txt

बातमी क्र..१५ (टुडे पान २ साठी)
(टीप- या फोटोत एक आमदार निकमांचा उभा फोटो दिला आहे. एकाला पानाला तो वापरावा.)

आमदार शेखर निकम वाढदिवस विशेष---डोके

फोटो ओळी
-rat२८p२५.jpg-
८५८११
चिपळूण ः क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थी, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यातही आमदार शेखर निकम कायम पुढाकार घेत असतात.
-rat२८p२६.jpg-
८५८१२
जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आमदार शेखर निकम यांनी आंदोलने केली आहेत.
-rat२८p२७.jpg-
८५८१३
मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्याने कोकणातील ग्रामस्थांना वाहतुकीची चांगली व्यवस्था मिळावी यासाठी आमदार शेखर निकम यांनी फलकबाजी करून सरकारचे लक्ष वेधले होते.
-rat२८p२८.jpg-
८५८१४
लोकसभेच्या माजी अध्यक्षा समुत्राताई महाजन यांचे चिपळुणात स्वागत करताना आमदार शेखर निकम.
-rat२८p२९.jpg-
८५८१५
आमदार शेखर निकम
--
सह्याद्रीच्या पर्वतरांगेत, हिरवाईने नटलेल्या झाडीत, कापसी नदीच्या तीरावर वसलेलं छोटसं सावर्डे गाव. याच गावच्या मातीत स्व. गोविंदरावजी निकम साहेब यांनी सहकार रूजवला. गावविकासाची मशागत झाली. अशा मातीत विकासाचा ध्यास आणि आस घेऊन सहकार, समाजकारण, शिक्षण, कृषी, क्रीडा व राजकारणातील एक सुसंस्कृत आणि संयमी चेहरा, सहकार महर्षी स्व. गोविंदरावजी निकम साहेब यांचा वारसा पुढे चालवणारे, सह्याद्री परिवाराला परमेश्वराने दिलेली एक अमूल्य देणगी, ना समृद्ध वारशाचा गर्व ना परंपरेचा उन्मादी अभिमान. प्रत्येकवेळी नवीन काही उभारण्याच्या वेळी नवीन मार्ग धुंडाळताना ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्यातील प्रचंड ऊर्जेला साद घालणारं नेतृत्व म्हणजे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट, दमदार, आमदार आदरणीय शेखरजी निकम सर यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या वाटचालीचा घेतलेला वेध ...
---

ध्यास विकासाचा, विश्वास चिपळूण -संगमेश्वरकरांचा

कोकणच्या दऱ्याखोऱ्यातील वाडीवस्तीत राहणाऱ्या सामान्य कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने १९५७ला सह्याद्री शिक्षणसंस्थेची स्थापना स्व. गोविंदराव निकम साहेब यांनी केली. त्यांच्या नवनवीन कल्पना, त्याग, संस्था उभारणीमध्ये त्यांचे स्वप्न आकाशाला गवसणी घालणारे होते. गोविंदराव निकम साहेबांच्या अचानक जाण्यामुळे सह्याद्री शिक्षणसंस्थेची जबाबदारी अनपेक्षितपणे शेखर सर यांच्यावर आली. एवढी मोठी संस्था, तिचा व्याप सांभाळणे सोपे नव्हते; पण घरातच समाजसेवेचे बाळकडू मिळालेल्या आमदार शेखर सर यांनी संस्थेचे शिवधनुष्य उचलले व ते लिलया पेलले. संतपरंपरेत म्हटल्याप्रमाणे ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस या उक्तीप्रमाणे संस्थेला यशोशिखरावर नेण्याचे अलौकिक काम आदरणीय शेखर सर करत आहेत.
कोकणातील एक अग्रणी संस्था म्हणून या संस्थेच्या माध्यमातून शाळा, व्यावसायिक, महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम सुरू करून संस्थेने विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक दालने खुली केली आहेत. निकम साहेब यांच्यानंतर सह्याद्री शिक्षणसंस्थेत शिक्षणाच्या शाखांचा विस्तार करून आदर्श संस्था उभी करण्याचे काम ते करत आहेत. सह्याद्री हा एक परिवार म्हणून सह्याद्रीच्या प्रत्येक सदस्याला आदराची वागणूक देऊन संस्थेचा प्रमुख असलो तरी संस्था आपणा सर्वांची आहे, असा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. शेखर सर म्हणजे आदर्श विचाराने समृद्ध व्यक्तिमत्व आहे. त्यामुळेच संस्थेची वाटचाल आदर्शवत होत आहे. आज संस्थेच्या विविध शाखा व तेथील कामकाज पाहण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक मान्यवर शिक्षणप्रेमी भेट देत असतात. रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे या गावाला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख प्राप्त करून देण्याचे काम सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून सरांनी केले आहे.
कोकणातील मुले व्यावसायिक शिक्षणासाठी आर्थिक दुर्बलतेमुळे शहरात जाऊ शकणार नाहीत याची जाणीव असल्यामुळे त्या मुलांची शिकण्याची तृष्णा भागवण्याचे भगीरथ कार्य सर करत आहेत. जुन्या-नव्या साथीदारांच्या ज्ञान व अनुभव यांचा सुंदर मिलाफ साधून या संस्थेचे काम अत्युच्च दर्जाचे राखण्याचा सरांनी कसोशीने प्रयत्न केला आहे. सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून मुलींच्या-महिलांच्या शिक्षणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून महिला सक्षमीकरण करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. महिला बचतगटांना मार्गदर्शन करण्याचे केंद्र, कायमस्वरूपी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, करिअर मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन, रोजगारविषयक कार्यशाळा, संस्कार शिबिराचे आयोजन करून परिसराच्या विकासासाठी व सामान्य जनतेच्या सन्मानासाठी वडिलांप्रमाणे आदर्श कार्य शेखर सर करत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणाचा आखाडा समजल्या जाणाऱ्या चिपळूण तालुक्यातील अनेकांनी अगदी राज्यस्तरीय राजकारणात आपला ठसा उमटवला असला तरी आज जिल्हाभर उभ्या असलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या फळीला मजबूत आधार आमदार शेखरजी निकम सर यांचाच आहे हे लपून राहिलेले नाही. नेतृत्व करत असताना सरांनी आपल्या मागून चालणाऱ्यांच्यापेक्षा आपल्यासोबत चालणाऱ्यांची भव्य मांदियाळी निर्माण केली. कार्य किंवा पदांची ओळख निर्माण करण्यापेक्षा सरांची माणसं म्हणून त्यांची ओळख रूजली. शेलकी माणसं वेचले ती कामं हलकी होतात यानुसार हलक्या माणसांच्याकडून शेलकी काम सरांनी करून घेतली. तसं सरांच्या जवळ हलकं आणि भारी असं काहीच नव्हतं. म्हणूनच सरांच्या राजकीय कार्याचा आढावा घ्यायचा झाल्यास रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक, रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष, सह्याद्री शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष आणि चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार अशा प्रत्येक पदाला योग्य न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या मतदार संघात स्वतःच्या कर्तृत्वाने शेखर सर निवडून आले व चिपळूण-संगमेश्वरवासीयांचे स्वप्न पूर्ण झाले. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी ते कटिबद्ध झाले. याची चुणूक पहिल्याच अधिवेशनात दाखवायला सुरवात केली. विधानसभा अधिवेशनात ४४ तारांकित प्रश्न उपस्थित करण्याबरोबरच आपल्या मतदार संघातील चिपळूण व देवरूख शहरातील विकासकामासाठी १० कोटींचा तर तिवरे धरणाच्या पुनर्बांधणीसाठी साडेनऊ कोटींचा निधी मंजूर करून घेतला व खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींनी करावयाच्या विकासाची व्याख्याच सरांनी बदलून टाकली. जिल्ह्याच्या विकासाचे आदर्श स्वरूप डोळ्यासमोर ठेवून सर नेहमीच कार्यरत असतात. गटतट, जातपात या गोष्टींना थारा न देता आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे काम प्रामाणिकपणे ते करत आहेत.
आदरणीय शेखर सर म्हणजे शिक्षण आहे, धडाडी आहे, कुटुंबाने दिलेले संस्कार आहेत, कुटुंबाचा समाजसेवेचा वसा आहे, परिसराच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, समाजाला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी अनेक विकासकामे ते करत आहेत. नळपाणी योजना, विहिरी, कूपनलिका या योजना वाडीवस्तीवर राबवून पाणीसमस्येच्या निराकरणासाठी प्रयत्नशील आहेत. सरांनी क्रीडाक्षेत्रात काम करताना आपल्या कोकणातील जास्तीत जास्त मुले राष्ट्रीय स्तरावर पोहोचावेत यासाठी सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करून या प्रबोधिनीद्वारे अनेक खेळाडूंना विविध खेळातून करिअर घडवण्याचा मार्ग निर्माण करून दिला आहे. एवढेच करून ते थांबले नाहीत तर स्व. गोविंदराव निकम पोलिस व सैन्यभरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र पूर्णपणे मोफत अन् सर्व सुविधांयुक्त सुरू केले आहे.
कोरोनासारख्या महामारीच्या काळात सर आपल्या मतदार संघात एक कुटुंबप्रमुख म्हणून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची काळजी घेत होते. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीला रुग्णालयात हजर करण्यापासून त्याला उपचार मिळेपर्यंत व सुखरूप घरी येईपर्यंत सर त्यांची काळजी घेत होते आणि त्यामुळेच चिपळूण-संगमेश्वरवासीयांना सर हे फार मोठा आधार वाटतात. २२ जुलै २०२१ ला चिपळूणला महापूर आला व पुन्हा एक संकट मतदार संघावर आले; पण संकटाने खचून जातील ते शेखर सर कसले? उलट त्या दिवसापासूनच चिपळूणवासीयांना त्या महापुरातून सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी सरांनी शर्थीचे प्रयत्न केले. पूर ओसरल्यानंतर चिपळूण शहर पूर्ववत करण्यासाठी अगदी साफसफाईपासून ते लोकांच्या राहण्याची, जेवणाची सर्व सोय सरांनी केली. यामध्ये सरांवर प्रेम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक लोकप्रतिनिधी, अनेक स्वयंसेवी संस्था, प्रसिद्ध उद्योजक सरांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. सरांनी या लोकांना आधार देऊन मोठ्या संकटातून बाहेर काढले व लोकप्रतिनिधींची जबाबदारी काय असते हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले.
शैक्षणिक, औद्योगिक, कला, क्रीडा, संस्कृती, वैद्यकीय या प्रत्येक क्षेत्राच्या विकासाचा माझ्या मनी ध्यास आहे. समाजसेवेचा वारसा मला घरातूनच मिळाला आहे. त्यामुळे जनतेचे काम करणे, सेवा करणे हे माझे काम आहे. या विचारावर काम करणारा शांत व संयमी झंजावात महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर आपला ठसा नक्कीच उमटवेल, अशा या
सह्याद्रीला गवसणी घालणाऱ्या कर्तृत्वाला ॥
कोकणचा मानदंड ठरलेल्या नेतृत्वाला॥
उदंड आयुष्य, निरोगी आरोग्य लाभो, अधिकाधिक कार्य करण्यासाठी उत्तरोत्तर उच्च पदांची प्राप्ती व्हावी आणि सरांचा पुढचा वाढदिवस नामदार शेखर निकम सर असा लेख लिहिण्याचे भाग्य मला मिळावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.... !
''चित्ती सद्गुण ठाई, कर्तृत्वाची अथांग झोळी
उजळून गेली चिपळूण-संगमेश्वर नगरी, नेतृत्वाची दिव्य झळाळी ''

- श्री. काकडे जयंत रघुनाथ (सहा. शिक्षक )
गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com