वाचनाचा छंद जोपासा, मराठी वाचक वाढवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाचनाचा छंद जोपासा, मराठी वाचक वाढवा
वाचनाचा छंद जोपासा, मराठी वाचक वाढवा

वाचनाचा छंद जोपासा, मराठी वाचक वाढवा

sakal_logo
By

85867
कणकवली : येथील कणकवली कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना डॉ.राजश्री साळुंखे. शेजारी प्रा.युवराज महालिंगे, प्रा. सीमा हडकर.

वाचनाचा छंद जोपासा, मराठी वाचक वाढवा

प्रा.डॉ. साळुंखे : कणकवली कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन

कणकवली, ता.२८ : स्मार्टफोनमुळे नवी पिढी वाचनापासून दूर होत आहे; मात्र मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्‍येकाने वाचनाचा छंद जोपासावा. त्‍या वाचनातून येणाने अनुभव इतरांना सांगावेत आणि मराठी वाचक वाढवावेत, असे आवाहन कणकवली कॉलेज शिक्षण संस्थेच्या चेअरमन डॉ.राजश्री साळुंखे यांनी केले.
येथील कणकवली कॉलेजमध्ये आज मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम झाला. यावेळी वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला डॉ. साळुंखे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रा. युवराज महालिंगे, प्रा. अरुण चव्हाण, प्रा. सीमा हडकर, प्रा. विनिता ढोके, प्रा. विजयकुमार सावंत उपस्थित होते.
प्रा. सीमा हडकर यांनी आजच्या डिजिटल युगातही मराठी भाषा अस्तित्व टिकवून असल्याचे सांगितले. तसेच नवनवीन प्रसार माध्यमांच्या वापर लिहिते आणि बोलते होण्यासाठी करा, असे आवाहन त्‍यांनी केले. प्रा. अरुण चव्हाण यांनीही मनोगत मांडले. तर विद्यार्थ्यांमधून साक्षी हर्णे, संयुक्ता गावकर, चंदन नावगेकर, साक्षी गावकर, दिव्या मगर, जान्हवी सुतार, मनस्वी खरात आदींनीही मराठी भाषेबाबत मनोगत व्यक्त केले.
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मराठी विभागातर्फे ‘काव्यरंग’ कार्यक्रम सादर झाला. यात संत, पंत, तंत कवितेपासून ते साठोत्तरी कवितेपर्यंतच्या कवींच्या कवितांचे अभिवाचन करून गीत गायनाचा कार्यक्रम झाला. सार्थक ठकरूल, मृणाल गावकर, सुचिता आरेकर, ऐश्वर्या घाडीगांवकर यांनी गीत गायन केले. तर प्रा. सीमा हडकर, बुद्देश सावंत, अक्षता पाडलोसकर यांनी कविता वाचन केले. प्रा. विनिता ढोके यांनी प्रास्ताविक केले. मृणाल गावकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विजयकुमार सावंत यांनी आभार मानले.
--
भाषा संवर्धनासाठी उपक्रम हवेत
डॉ.साळुंखे म्‍हणाल्या, दर कोसावर भाषा बदलते तरीही माणसांमधील संवाद तुटलेला नाही. प्रत्‍येक भागातील अभिरूची मराठी साहित्‍यामधून अनेकविध साहित्‍यिकांनी मांडली आहे. वाचनाच्या माध्यमातून ते अनुभव प्रत्‍येकाने घ्यायला हवेत. प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे यांनी मराठी भाषेचे महत्त्व व मराठीतील दर्जेदार साहित्याचा आढावा घेऊन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाविद्यालयीन पातळीवर वेगवेगळे उपक्रम राबविले पाहिजे, असे मत व्यक्त केले.