संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

rat२८p११.jpg-KOP२३L८५७८५ सुभाष थरवळ

ज्येष्ठ नागरिक संघाच्या
अध्यक्षपदी सुभाष थरवळ
रत्नागिरी ः रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाची पुढील दोन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. नवीन कार्यकारिणीची पहिली सभा सोमवारी (ता. २७) झाली. यामध्ये अध्यक्षपदी सुभाष थरवळ यांची फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्ष पद्मजा बापट, कार्याध्यक्ष डॉ. विजय निंबाळकर, कोषाध्यक्ष शरद रेडीज तसेच कार्यवाह दिलीप पवार व सुरेश पावसकर यांची निवड झाली. श्रीहरी सरपोतदार, भगवान बापट, प्रभाकर लोंढे, सतीश चांदोरकर व आशा नागवेकर यांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली. मागील कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला आणि नवीन सदस्यांचे स्वागत करण्यात आले. सभासदवाढीचा कार्यक्रम प्रामुख्याने हाती घेण्याचे तसेच कोरोना कालावधीत खंडित झालेले संघाचे सर्व कार्यक्रम नव्या जोमाने पुन्हा सुरू करण्याचे आवाहन अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी केले.
---------

स्वातंत्र्यवीर सावरकरांना
भारतरत्न देण्याची मागणी
साडवली ः स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतीथीनिमित्त देवरूखवासियांनी स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे एकत्रयेऊन अभिवादन केले. नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, नगरसेविका प्रतीक्षा वणकुद्रे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अण्णा शहाणे, अनिल साळवी, युयुत्सु आर्ते आदींसह व्यापारी, नागरिक उपस्थित होते. या वेळी आर्ते यांनी स्वातंत्र्यकाळातील सावरकरांचे कार्य विषद केले. स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांची केलेली कामगिरी पाहता सावरकर यांना सरकारने भारतरत्न जाहीर करावे, अशी देवरूखवासियांतर्फे मत व्यक्त केले. या मागणीसाठी लढा उभारला जाईल, सह्यांचे निवेदन शासनापर्यंत पोहचवले जाईल प्रसंगी याच चौकात आंदोलनही करण्याची तयारी सर्वांनी बोलून दाखवली. स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील सुशोभीकरणाचे काम लवकरच हाती घेतले जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्षांनी दिली. या वेळी चौक परिसरात स्वच्छ देवरूख सुंदर देवरूख ब्रीदवाक्य घेऊन काम करणार्‍या नागरिकांनी स्वच्छतामोहीम राबवली.


rat२८p१० ः KOP२३L८५७८४
पावस ः रायगड जिल्ह्यातील कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार निमिष विश्वासराव या वंशजांकडून किल्ले कर्नाळा दुर्गपूजा करण्यात आली.

किल्ले कर्नाळ्यावर
दुर्गपूजा उत्साहात
पावस ः २६ फेब्रुवारीला किल्ले कर्नाळ्यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गपूजा उत्साहात पार पडली. देशभरात १२५ किल्ल्यांवर दुर्गपुजेचे शिवाजी ट्रेल या संस्थेतर्फे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गडदेवता करणाई देवीची पूजा व आरती करण्यात आली. किल्ले कर्नाळ्यावर दुर्गपुजेसाठी शिवकाळातील कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार विश्वासराव यांचे थेट वंशज उपस्थित होते तसेच क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्था, एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, कल्याण स्पोर्ट्स आणि फाईन आर्टस् या अॅकॅडमीचे विद्यार्थी व अन्य शिवप्रेमी उपस्थित होते.
-----------

rat२८p१३.jpg ःKOP२३L८५७८७ दहागाव ः आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करताना सर्व मान्यवर.

दहागाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे
मंडणगड ः तालुक्यातील लालबहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरवात पौष्टिक तृणधान्य गीताने झाली. यामध्ये प्रामुख्याने नाचणी, राळा, वरई, ज्वारी, बाजरी, राजगिरा इ. पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व व फायदे या विषयी माहिती देण्यात आली. तसेच कोकणातील भातानंतरचे प्रमुख पीक असलेल्या नाचणीपासून बनवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या पौष्टिक पदार्थ नाचणीचे लाडू, नाचणीचे सत्व, नाचणीचे पापड, बिस्कीट, नाचणीची वडी, चकली, इडली इ. नाचणीचे प्रक्रियायुक्त पदार्थांची माहिती देण्यात आली व विविध योजनांची माहिती देणारी व पौष्टिक तृणधान्याची रांगोळी काढण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून दिनेश पेडणेकर यांनी उपस्थित विद्यार्थी व शेतकरी यांना प्रशिक्षण दिले. या वेळी उपसरपंच रूपाली मोरे, मुख्याध्यापक हुलगे, इंगळे, कलमकर, माने, नाटेकर व शिपाई गौळ, गुडेकर व कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी एस. वी. घोडके उपस्थित होते.