कुडाळ नगरपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ नगरपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर
कुडाळ नगरपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर

कुडाळ नगरपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर

sakal_logo
By

कुडाळ नगरपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर
कुडाळ, ता. २८ ः येथील नगरपंचायतीचा एकूण महसुली खर्च ६ कोटी ६६ लक्ष ४७ हजार ३०६ आहे. प्रारंभिक शिल्लक २२ कोटी ४१ लक्ष ४ हजार ८६१ रुपये असलेला शिलकी रकमेचे अंदाजपत्रक सर्वानुमते संमत करण्यात आले, अशी माहिती मुख्याधिकारी सूरज कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
नगरपंचायतीच्या विशेष सभेत नागरिकांना देण्यात येणान्या सुविधांबरोबरच आरोग्य, पाणी, स्वच्छता, महिला व बालकल्याण तसेच नागरिकांसाठी तरतूद केलेला २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे शिलकी रक्कमेचे अंदाजपत्रक नगराध्यक्षा आफरीन करोल यांनी सभागृहात सादर केले. हे अंदाजपत्रक सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
कुडाळ नगरपंचायतीची विशेष सभा आज नगराध्यक्ष करोल यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत सभागृहात झाली. यावेळी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, सर्व नगरसेवक, सर्व नगरसेविका, मुख्याधिकारी सूरज कांबळे, प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक व सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. अर्थसंकल्पाचे वाचन लेखापाल स्वप्नील पाटील यांनी केले. या अंदाजपत्रकाची प्रारंभिक शिल्लक २२ कोटी ४१ लक्ष ४ हजार ८६१ रुपये एवढी दाखविण्यात आली. तर एकूण महसुली जमा ६ कोटी ७० लाख ८० हजार ७०० दाखविण्यात आली. एकूण महसुली खर्च ६ कोटी ६६ लाख ४७ हजार ३०६ आहे. अशाप्रकारे शिलकी रक्कमेचा अर्थसंकल्प सर्वानुमते संमत करण्यात आला. या अर्थसंकल्पात हायमास्ट खरेदी, पाणी योजना, सक्शन मशिन, रस्ता दुरुस्ती, नवीन वाहन खरेदी, बायोगॅस प्लॅन्ट, नवीन उद्यान, शहर विकासासाठी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी कांबळे यांनी दिली.
...................

अंदाजपत्रकातील तरतुदीत
केवळ आकड्यांचा खेळ

भाजप गटनेते; कुडाळ नगरपंचायतीबाबत आरोप

कुडाळ, ता. २८ ः येथील नगरपंचायतीच्या २०२४-२४ चा शिलकी अंदाजपत्रक मांडण्यात आले. यात गेल्यावर्षी सुचवलेल्या तरतुदी तसेच मांडलेल्या सूचना न घेता केवळ आकड्यांचा खेळ मांडण्यात आला. या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या प्रकारे कर नव्याने निर्माण करता येईल याबाबत कोणतीही योजना केलेली नाही, अशी टीका भाजप नगरसेवक गटनेते विलास कुडाळकर यांनी केली.
येथील नगरपंचायतीच्या अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर खर्च करण्यासंदर्भात तरतूद केली जाते; मात्र त्यांना त्याचा लाभ मिळत नाही. म्हणून गेल्या वर्षी सूचना मांडून याबाबत कार्यवाही करा, असे सांगण्यात आले होते; मात्र यासाठी आवश्यक असणारी उपविधी प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे यावर्षी सुद्धा फक्त तरतूद करण्यात आली; पण कार्यवाही करण्यात आलेली नाही. नगरपंचायत क्षेत्रामध्ये अनेक घरगुती चाळी व सदनिकाधारक आहेत. यामध्ये अनेकजण भाडेकरू आहेत; मात्र या सदनिका मालक किंवा चाळींना घरपत्रकानुसार घरपट्टी बसवली जाते. यामध्ये भाडेकरू राहत असल्यामुळे तो वाणिज्य वापर होतो म्हणून त्या घरपट्टीमध्ये वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार सर्वे करावा असे सांगण्यात आले. यावेळी भाजपचे नगरसेवक अभी गावडे यांनी मोकाट कुत्री नियंत्रण करणे यावर काय कार्यवाही केली? असे विचारले असता अद्याप भटक्या कुत्र्यांवर केलेल्या शस्त्रक्रिया संदर्भातील बिले झाली नसल्यामुळे यावर्षी फक्त १० हजार रुपये तरतूद करण्यात आली आहे. याबाबत नगरसेवक गावडे यांनी भटक्या कुत्र्यांवरील शस्त्रक्रिया बिल अदा करू नये, अशी मागणी केली. नगरसेवक नीलेश परब यांनी अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी खर्च दाखवण्यात आला आहे; मात्र अनधिकृत बांधकामे काढण्यात आलेली नाही. याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी केली. या अर्थसंकल्पात पर्यटन, सांस्कृतिक अशा अनेक प्रकारच्या तरतुदी केल्या आहेत; मात्र त्याचा खर्च किंवा ती रक्कम कुठून येणार याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.