कणकवली : महामार्ग अपूर्ण उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : महामार्ग अपूर्ण उपोषण
कणकवली : महामार्ग अपूर्ण उपोषण

कणकवली : महामार्ग अपूर्ण उपोषण

sakal_logo
By

85963
वरवडे : येथील आयडियल इंग्‍शिल स्कूलमध्ये डॉ.ए.पी.जे. अब्‍दूल कलाम यांची मानवी प्रतिकृती साकारण्यात आली.


वरवडेत साकारली डॉ.कलाम यांची मानवी प्रतिकृती

राष्ट्रीय विज्ञान दिन; विद्यार्थी, पालकांचा सहभाग, साडेतीनशेहून अधिक वादकांचा नादसंगम

कणकवली, ता.२८ : राष्‍ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वरवडे येथील आयडियल इंग्‍लिश स्कूलच्या परिसरात एक हजारहून अधिक विद्यार्थी, पालक, कलाकारांच्या सहभागातून डॉ.ए.पी.जे अब्‍दुल कलाम यांची प्रतिकृती साकारण्यात आली. यावेळी साडेतीनशेहून अधिक तबला, पखवाज, हार्मोनियम वादकांनी अनोखा नादसंगमही घडवून आणला. या उपक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्याची माहिती आयडियल इंग्लिश स्कूलचे प्रा.हरिभाऊ भिसे यांनी दिली.
आयडियल इंग्लिश स्कूल, सोमस्थ अॅकॅडमी कणकवली आणि सिंधुगर्जना ढोलताशा पथकांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. सकाळी दहाला साडेसहाशे विद्यार्थी आणि तेवढ्याच संख्येने पालक, जिल्ह्याच्या विविध भागातील कलावंतांच्या सहभागातून डॉ.ए.पी.जे. अब्‍दूल कलाम यांची मानवी आकृती साकारण्यात आली.
यावेळी जिल्हाभरातून आलेले पखवाज वादक, तबला वादक, हार्मोनियम वादक तसेच, ढोलक, मृदंग, टाळ, हलगी, दिमडी, संबळ आदींनी सलग एक तास वाद्ये वाजवून मानवी प्रतिकृतीमध्ये सहभागी झालेल्‍यांचा जोश वाढवला. यावेळी ज्ञानदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, सचिव प्रा. हरिभाऊ भिसे, बुलंद पटेल, सचिव नीलेश महिंद्रकर, डी. पी. तानवडे, शीतल सावंत यांच्यासह सावी लोके, राजेश शिर्के, मुख्याध्यापिका अर्चना देसाई, दीपक बेलवलकर, अशोक करंबेळकर, डॉ. सुहास पावसकर, पत्रकार गणेश जेठे, महेश सावंत, मिलिंद मेस्त्री, अण्णा कोदे, डॉ. आपटे, अनंत बढे, संदीप पेंडुरकर, योगेश गोडवे आदी उपस्थित होते. या उपक्रमात खारेपाटण विद्यालय, जि. प. शाळा नंबर १, जि. प. शाळा नंबर २, जि. प. शाळा कलमठ डिगस हायस्कूल, आयडियल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. राजेश कदम यांनी आभार मानले.