
कुडाळ एमआयडीतून परप्रांतीय तरुण बेपत्ता
८५९७०
कुडाळ एमआयडीतून
परप्रांतीय तरुण बेपत्ता
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ ः बांव सुरबाचीवाडी येथे राहणारा राहुल हरिनाम कुमार (वय २४) हा १९ फेब्रुवारीपासून कुडाळ एमआयडीसी या ठिकाणाहून बेपत्ता झाला आहे. याबाबत त्याची पत्नी सौ. रोहिणी राहुल कुमार हिने येथील पोलीस ठाण्यात आज बेपत्ताची तक्रार दाखल केली आहे.
उत्तर प्रदेशातील राहुल कुमार हा सध्या बांव सुरबाची वाडी येथे राहत आहे. तो आणि त्याची पत्नी रोहिणी कुमार हे दोघेही १९ फेब्रुवारीला कुडाळ एमआयडीसी येथे काम शोधण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान राहुल कुमार यांनी आपल्या पत्नीला काजू कंपनीमध्ये काम असेल तर बघून ये, असे सांगितले आणि तो एमआयडीसी येथे उभा राहिला. त्याच्या पत्नीने काजू कंपनीमध्ये काम असल्याचे पाहून आल्यानंतर येथील एमआयडीसीमध्ये ज्या ठिकाणी त्याचा पती राहुल कुमार हा उभा होता. तो त्या ठिकाणी सापडून आला नाही. त्याचा शोधा शोध नातेवाईकांकडे केला; मात्र तो सापडून आला नाही. आज येथील पोलीस ठाण्यात त्याची पत्नी रोहिणी कुमार यांनी बेपत्ताची तक्रार दाखल केली आहे.