
विभागीय बाल महोत्सवात सिंधुदुर्गनगरी बालगृहाचे यश सिंधुदुर्गनगरी बालगृहाचे यश
विभागीय बाल महोत्सवात
सिंधुदुर्गनगरी बालगृहाचे यश
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २८ : मुंबई येथे पार पडलेल्या विभागीय चाचा नेहरू बाल महोत्सवात येथील शासकिय निरीक्षणगृह व बालगृहातील बालकांनी नेत्रदीपक यश मिळविले. या सर्व बालकांचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, बालगृहाचे अधीक्षक बी.जी. काटकर यांनी अभिनंदन केले.
यामध्ये चैतन्य परब-गोळाफेक प्रथम, आदित्य राठोड (न्यू इंग्लिश स्कूल ओरोस)-१०० मीटर धावणे प्रथम, निहीत मालवणकर व आदित्य राठोड-कॅरम स्पर्धेत द्वितीय, स्वराज पाटील (डॉन बॉस्को स्कुल ओरोस)-वक्तृत्व स्पर्धेत तृतीय यांनी यश मिळविले. विभागीय चाचा नेहरू बाल महोत्सव २३ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत दी चिल्ड्रेन अँड सोसायटी संचलित चेंबूर चिल्ड्रेन्स होम, मानखुर्द मुंबई येथे विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास विभाग, कोकण विभाग, मुलुंड-मुंबई यांच्यावतीने आयोजित करण्यात आला. या बालमहोत्सवामध्ये कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील बालगृह व निरीक्षणगृह संस्थांनी सहभाग घेतला. यामध्ये विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये शासकिय निरीक्षणगृह व बालगृह या संस्थेतील बालकांनी सहभाग घेऊन देदीप्यमान यश संपादन केले.