पांचाळ-सुतार मंडळाच्या अध्यक्षपदी भगवान सुतार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पांचाळ-सुतार मंडळाच्या अध्यक्षपदी भगवान सुतार
पांचाळ-सुतार मंडळाच्या अध्यक्षपदी भगवान सुतार

पांचाळ-सुतार मंडळाच्या अध्यक्षपदी भगवान सुतार

sakal_logo
By

rat०११४. txt

बातमी क्र. १४ (टुडे पान ४ साठी)

पांचाळ-सुतार मंडळाच्या अध्यक्षपदी भगवान सुतार

समाजमंदिर बांधण्यावर चर्चा ः विविध प्रश्नांची उकल

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ः पांचाळ- सुतार समाजमंडळाची तालुकास्तरीय जाहीर सभा शहराजवळील एमआयडीसी येथील रमेश पांचाळ यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या निवडीत पांचाळ-सुतार समाजमंडळाच्या अध्यक्षपदी भगवान सुतार, तर उपाध्यक्षपदी रमेश पांचाळ यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.
तालुकास्तरीय जाहीर सभेत विविध प्रश्नांची उकल करण्यात आली. महत्वाचा मुद्दा म्हणजे पांचाळ-सुतार समाजमंडळाची शहरातील पऱ्याची आळी येथील जुनी जागा विकून नवीन मोठ्या जागेत समाजमंदिर बांधण्यासाठी चर्चा झाली. जागेसंदर्भातील काही कागदपत्रांच्या त्रुटी समाज मंडळातील ज्येष्ठ समाजबांधवांच्या सल्ल्याने तसेच वकिलांच्या सहकार्याने जुनी जागा विकून नवीन मोठ्या जागेत समाजमंदिर बांधण्यासाठी सर्वानुमते निश्चित करण्यात आले तसेच यापूर्वीचे पांचाळ-सुतार मंडळाचे काही कार्यकारिणीचे सदस्य सातत्याने गैरहजर अथवा त्यांच्या काही समस्या असल्याने त्यांच्याकडून राजीनामा घेण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आले. समाजमंदिर बांधण्यासाठी सर्वांनी यथाशक्ती पाठबळ द्यावे, असे सर्वानुमते ठरवण्यात आले.
या वेळी समाजमंदिर बांधणीसाठी नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. नवीन कार्यकारिणी अशी अध्यक्ष ः भगवान सुतार, उपाध्यक्ष रमेश पांचाळ, सचिव संतोष माचकर, सहसचिव संजय नांदगावकर, खजिनदार शैलेश शिळकर आदींची निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून राजेंद्र माचकर, प्रशांत माचकर, पराग नांदगावकर, नरेश पांचाळ, रोहित माचकर, अशोक पांचाळ (धामणसे), विनित नांदगावकर, यश निवळकर, काशिनाथ थवी, महिला सदस्य संपदा नांदगावकर, संजना माचकर, मुग्धा माचकर, आरती निवळकर आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली.