
धरणांची साखळी शेतीसाठी पूरक
rat०१२.txt
बातमी क्र.. २ ( टुडे पान १ साठी अॅंकर)
धरणे आणि विकास-- भाग १ .................लोगो
फोटो ओळी
-rat१p२.jpg ः
८६०५८
राजापूर ः पाण्याने भरलेले अर्जुना धरण.
-rat१p३.jpg ः
८६०५९
ओझर धरणामध्ये झालेला पाणीसाठा.
--
दरवर्षी मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे कोकणातील नद्यांना पूर येतो. पावसाच्या पाण्याचा साठा करणे वा जमिनीमध्ये जिरवण्याच्यादृष्टीने योग्य ती उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. नद्या उन्हाळ्यात कोरड्या ठणठणीत असतात. पाण्याच्या अन्य स्त्रोतांचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. मात्र, धरणांत पाणी अडवल्यास तो पाणीसाठा विकासाच्यादृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तालुक्यामध्ये डझनभरापेक्षा अधिक छोट्या-मोठ्या धरण प्रकल्पांची उभारणी झाली आहे. त्यापैकी बहुतांश प्रकल्प पूर्ण झाले असून, काही धरण प्रकल्पांची वाटचाल सुरू आहे. या धरणांमुळे वाढणाऱ्या सिंचनक्षमतेमुळे भविष्यात तालुक्याच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. त्यावर प्रकाशझोत टाकणारी मालिका आजपासून
- राजेंद्र बाईत, राजापूर
-
धरणांची साखळी शेतीसाठी पूरक
१७ प्रस्तावित; ५ प्रकल्पात पाणीसाठा, उर्वरित रखडलेली
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ ः सिंचन क्षमता वाढवण्याच्यादृष्टीने तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये अनेक छोट्या-मोठ्या धरण प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. त्यावर आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचा शासननिधीही खर्च करण्यात आला आहे. त्यापैकी काहींचे बांधकाम पूर्ण होऊन त्यामध्ये पाणीसाठा झाला आहे तर काहींचे बांधकाम सुरू आहे. धरण प्रकल्पांतून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा सुयोग्य वापर झाल्यास शेतीतून रोजगार निर्मिती अन् त्या त्या परिसरातील पाणीटंचाई दूर होताना भविष्यामध्ये सुजलाम् सुफलाम् राजापूर होण्यासह आर्थिक सुबत्ता निर्मिती होण्यास मदत होणार आहे.
विस्तारलेल्या राजापूर तालुक्यातून अर्जुना, कोदवली, जामदा अशा मोठ्या नद्या गेल्या कित्येक वर्षापासून वाहत आहेत. पावसाळ्यामध्ये पूर असलेल्या या नद्या मात्र उन्हाळ्यात कोरड्या शुष्क झालेल्या असतात. त्याला वर्षानुवर्षे नदीपात्रामध्ये साचलेल्या गाळासह अन्य विविध कारणे कारणीभूत आहेत. मात्र, या नद्यांवर ठिकठिकाणी छोट्या-छोट्या धरणांची उभारणी होऊन त्या माध्यमातून पाणी अडवल्यास त्याचा उपयोग शेतीसाठी अन् रोजगारनिर्मितीसाठी निश्चितच होणार आहे. भविष्यातील ही हरितक्रांती नजरेसमोर ठेवून तत्कालीन शासन आणि लोकप्रतिनिधींनी तालुक्यामध्ये १७ हून अधिक छोट्या-मोठ्या धरणांची उभारणी प्रस्तावित केली आहे. यापैकी अर्जुना धरण प्रकल्प, चिंचवाडी धरण (पांगरे), ओझर, जुवाठी, कोंड्ये आदी बहुतांश धरणांची कामे पूर्ण होऊन त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. काही धरणांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. अपुऱ्या राहिलेल्या धरणांची कामे रखडण्याला विविध कारणे आहेत. ते अडथळे दूर होऊन भविष्यामध्ये धरणांची रखडलेली कामे निश्चितच मार्गी लागणार आहेत. ज्या धरणांची कामे मार्गी लागली आहेत त्या धरणांमधील पाणीसाठ्याचा परिसरातील क्षेत्र शेतीच्या माध्यमातून ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. त्यातून, तालुक्याची सिंचनक्षमता वाढणार आहे. त्याचवेळी काही गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटण्यास साहाय्यभूत ठरणार आहे. या धरणांमधून होणारे सिंचन अन् शेतीतून राजापूर तालुका आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे.
--
राजापुरातील धरण प्रकल्प ः
काजिर्डा, अर्जुना मध्यम प्रकल्प, जामदा, चिंचवाडी धरण (पांगरे), चव्हाणवाडी (ताम्हाणे), काकयेवाडी, वाटूळ, कोंडवाडी (कळसवली), वाळवड (मूर), ओझर, तळवडे, झर्ये, पाचल, परूळे, सौंदळ बारेवाडी, कोंड्ये, जुवाठी, कशेळी, गोपाळवाडी, शीळ, चिखलगाव.