कासरल ग्रामपंचायत विकास निविदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासरल ग्रामपंचायत विकास निविदा
कासरल ग्रामपंचायत विकास निविदा

कासरल ग्रामपंचायत विकास निविदा

sakal_logo
By

होडावडा ग्रामपंचायत विकास निविदा
कणकवलीः वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा ग्रामपंचायतच्या वतीने विकास निविदा जाहीर केली आहे. यामध्ये होडावडा केंद्र शाळा क्रमांक एक येथे विंधन विहिर खोदून वीज पंप बसवणे यासाठी एक लाख २४ हजार रुपये निधी मंजूर केला आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे इंधन विहिर खोदून वीज पंप बसवण्यासाठी एक लाख २३ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला. यासाठी ३० जूनपर्यंत मुदत ठेवली आहे. या कामाच्या अटी शर्ती ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहेत.
----------
कासरल ग्रामपंचायत विकास निविदा
कणकवलीः तालुक्यातील कासरल ग्रामपंचायतीच्या वतीने विकास निविदा जाहीर केली आहे. मान्यता प्राप्त मुक्तेदारांकडून ही निविदा 6 मार्च पर्यंत कार्यालयीन वेळेत मागविली असून यामध्ये कासरल कोरमळा शाळा संरक्षण भिंतीसाठी 74 हजार 556 रुपये मंजूर केले आहेत. तसेच कोरमळा अंगणवाडी संरक्षण भिंत बांधण्यासाठी 79 हजार 997 रुपये मंजूर केले आहेत. या कामाच्या अटी शर्ती ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपलब्ध असून निविदा शक्य झाल्यास 7 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात उघडण्यात येणार आहेत.
----
कोंडये ग्रामपंचायत विकास निविदा
कणकवलीः तालुक्यातील ग्रामपंचायत कोंडये येथून विकास निविदा मागवली आहे. नोंदणीकृत ठेकेदारांकडून दरपत्रके बंद लकोट्यामध्ये निविदा ग्रामपंचायत कार्यालयात १४ मार्चपर्यंत सादर करावयाच्या आहेत. यामध्ये कोंडये वरचीवाडी रस्ता स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी एक लाख ५० हजार रुपये निविदा रक्कम मंजूर केली आहे. अटी शर्ती ग्रामपंचायत कार्यालयात असून विविध कपात ग्रामपंचायतीकडून केली जाणार आहे.
-------
सार्वजनिक बांधकाम रस्ते निविदा
कणकवलीः सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीतर्फे रस्ते विकास कामाची ई- निविदा जाहीर केली आहे. कुडाळ तालुक्यातील पणदुर- सुकळवाड, अनाव रस्त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी २३ लाख ७० हजार ६६४ रुपये रक्कम मंजूर केले आहेत. मान्यता प्राप्त नोंदणीकृत ठेकेदारांना ऑनलाईन निविदेमध्ये सहभाग घेण्यासाठी ८ मार्चपर्यंत मुदत आहे. ही ई निविदा १० मार्चला सकाळी ११ ते सायंकाळी सव्वा सहा पर्यंत ऑनलाईन पद्धतीने उघडली जाणार आहे.