
आमदार शेखर निकम अभिष्टचिंतन सोहळ्यास गर्दी
rat०१४०.txt
बातमी क्र. .४० (पान ५ साठी)
(टीप- तीन पाने पुरवणी होती, बातमी अत्यावश्यक)
फोटो ओळी
-rat१p३४.jpg ः
८६१७३
सावर्डे ः सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या परिवारातर्फे केक कापून वाढदिवस अभिष्टचिंतन करताना कर्मचारी.
-rat१p३५.jpg ः
८६१७४
कुटुंबीयांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करताना शेखर निकम सोबत पूजा निकम व कुटुंब.
--
आमदार शेखर निकम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
सावर्डेत सोहळ्यास अलोटगर्दी; स्व. निकमांच्या समाधीस्थळी अभिवादन
सावर्डे, ता. १ ः चिपळूण-संगमेश्वर विधानसभेचे आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या परिवारातर्फे केक कापून वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यास सुरवात झाली. या वेळी सह्याद्री शिक्षणसंस्थेचे सचिव महेश महाडिक, सर्व व्यावसायिक, शाखेचे प्राचार्य व कर्मचारीवृंद उपस्थित होते.
शेखर निकम यांच्या निवासस्थानी कौटुंबिक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. पूजा निकम यांनी औक्षण केले. स्व. गोविंदराव निकम यांच्या समाधीस्थळी आमदार शेखर निकम यांनी कुटुंबीयांसोबत दर्शन घेतले. नंतर शेखर निकम युवामंच व यंग बॉईज क्रिकेट क्लबच्यावतीने सर्व सभासदांच्या उपस्थित व्यासपिठावर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. अभिष्टचिंतन कार्यक्रमात चिपळूण, संगमेश्वर, देवरूख, राजापूर, गुहागर, खेड विधानसभा मतदार संघातील विविध पक्षातील कार्यकर्ते, हितचिंतक, शिक्षणप्रेमी, ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेने शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, तालुकाध्यक्ष खताते, अजित यशवंतराव, स. तु. कदम, पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे, उद्योजक सचिन पाकळे, केतन पवार, शिक्षक संघटना अध्यक्ष बळीराम मोरे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, चित्रपट कलाकार अभिनेता निखिल राजेशिर्के, अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मी यांनी आमदार निकम याना शुभेच्छा दिल्या.