ःस्टेट बँक भारतात रोजगार उपलब्ध करून देणारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ःस्टेट बँक भारतात रोजगार उपलब्ध करून देणारी
ःस्टेट बँक भारतात रोजगार उपलब्ध करून देणारी

ःस्टेट बँक भारतात रोजगार उपलब्ध करून देणारी

sakal_logo
By

rat०१२८.txt

बातमी क्र..२८ (पान ५ साठी)

फोटो ओळी
-ratchl१२.jpg ः
८६१३९
चिपळूण ः पराग वडके यांचा डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयात झालेला सन्मान.
---
रोजगार उपलब्ध करून देणारी स्टेट बँक

पराग वडके ; दरवर्षी २५०० पदांची निघते जाहिरात

चिपळूण, ता. ३ ः भारतातील शिखर बँक म्हणून ओळख असणारी स्टेट बँक ही भारतातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारी बँक असून ग्रामीण भागासाठी ती जीवनदायिनी आहे, असे प्रतिपादन स्टेट बँकेचे पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागाचे लर्निंग डेव्हलपमेंट अधिकारी पराग वडके यांनी केले.
मार्गताम्हाणे येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य विभागातील हिंदी विभागद्वारा आयोजित ''भारतीय स्टेट बँक और रोजगार के अवसर'' या विषयावर वडके बोलत होते. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. राजश्री कदम उपस्थित होत्या. पराग वडके यांनी एसबीआयमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध रोजगाराभिमुख योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. एसबीआयचे ॲडव्हायझर कसे होता येते याचेही मार्गदर्शन केले. एसबीआय लाइफ ॲडव्हायझरसाठी दहावी शैक्षणिक पात्रता असणारे विद्यार्थी अर्ज भरू शकतात. भारतातील कोणत्याही ठिकाणी परीक्षा देता येते. महाराष्ट्रात कोकण भागातील विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरी येथे या परीक्षेचे केंद्र असून, एसबीआयमार्फत ५० मार्कांची परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेत १८ गुण प्राप्त असणाऱ्या विद्यार्थी हा एसबीआय लाइफ ॲडव्हायझरसाठी निवडला जातो. त्यानंतर त्याला एसबीआयमार्फत प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानंतर तो अधिकृत ॲडव्हायझर म्हणून काम करू शकतो. विद्यार्थी लाईफ ॲडव्हायझर झाल्यानंतर स्वतःच्या पायावर उभा राहून व्यवसायामार्फत पैसे मिळवू शकतो,असे त्यानी सांगितले. भारतीय स्टेट बँकेमार्फत दरवर्षी २५०० पदांची जाहिरात काढली जाते, याबद्दलही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. एसबीआयचे बिजनेस मॅनेजर सुरेंद्र मोरे यांनी आपल्या सामाजिक क्षेत्रातील ''द हंगर दिल्ली ''या महिला सशक्तीकरणासाठी एसबीआयच्या विविध रोजगार विमुख योजनांची माहिती दिली.