अवघड क्षेत्रात बदलीने जाणार्‍या ‘ज्येष्ठां’ना दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवघड क्षेत्रात बदलीने जाणार्‍या ‘ज्येष्ठां’ना दिलासा
अवघड क्षेत्रात बदलीने जाणार्‍या ‘ज्येष्ठां’ना दिलासा

अवघड क्षेत्रात बदलीने जाणार्‍या ‘ज्येष्ठां’ना दिलासा

sakal_logo
By

rat०१३३.TXT

बातमी क्र.. ३३ (पान ३ साठी)

अवघड क्षेत्रात बदली होणाऱ्या ज्येष्ठांना दिलासा

जि. प. शिक्षक बदल्या ; ऑनलाईन नकारासाठी ८ पर्यंत मुदत

रत्नागिरी, ता. १ ः अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये नियुक्ती करण्याचा निर्णय झाल्यावर ५३ वर्षांवरील बदलीपात्र शिक्षकांच्या बाजूने संघटनांनी राज्य शासनाकडे दाद मागितली. त्यानंतर ग्रामविकास विभागाने बदली प्रक्रियेत ज्येष्ठ शिक्षकांना दिलासा देतानाच संबंधितांसाठी पोर्टलवर ऑनलाईन माहिती भरण्यासाठी कार्यक्रम राबवला आहे. ६ ते ८ मार्च या कालावधीत संबंधित शिक्षकांना बदलीसाठी नकार कळवायचा आहे. जिल्ह्यात सुमारे सव्वाशेहून अधिक शिक्षक यादीत समाविष्ट आहेत.
ग्रामविभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदलीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. सद्यःस्थितीत संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची कार्यवाही सुरू असून बदली प्रणालीत टप्पा १, २, ३, ४, ५ व ६ मधील कार्यवाही पूर्ण झाली आहे. तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमधील रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुरू आहे. अवघडमधील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी तयार केलेल्या शिक्षकांच्या यादीत सर्वसाधारण क्षेत्रात सलग दहा वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या शिक्षकांचा अधिक भरणा होता. विशेष संवर्ग १ मध्ये शिक्षकांची बदली ही विनंती बदली आहे; परंतु बदली प्रक्रिया राबवताना संवर्ग १ मधील काही शिक्षकांनी अनावधानाने बदलीतून सूट मिळण्याबाबतचा पर्याय स्वीकारला नव्हता. त्यामुळे सलग सर्वसाधारण क्षेत्रात काम केलेले अनेक शिक्षक अवघड क्षेत्रातील जागा भरण्याच्या यादीत आले तसेच संवर्ग १ मधील ज्या शिक्षकांची सेवा एकाच शाळेत ३ वर्षापेक्षा कमी झालेली आहे अशा शिक्षकांना बदलीतून सूट मिळण्याबाबतची संधी यापूर्वी देण्यात आलेली नाही. अशा शिक्षकांना सरसकट अवघड क्षेत्रात बदली करणे उचित ठरणार नाही, अशी निवेदने विविध शिक्षक संघटनांकडून राज्य शासनाला देण्यात आली होती.
शिक्षकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन शासनाने ज्या शिक्षकांनी यापूर्वी अनावधानाने बदलीतून सूट मिळण्याचा पर्याय स्वीकारलेला नाही त्यांना बदलीसाठी होकार किंवा नकार देण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या इतर सर्व शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळांचा पसंतीक्रम भरण्याची संधी दिली गेली आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागाकडून कार्यक्रम जाहीर केला आहे. अवघड क्षेत्रातील १६० जागा रिक्त असून, त्यासाठी शिक्षकांची यादी तयार केली होती. त्यामध्ये ८० टक्के शिक्षकांनी आपल्या नोकरीच्या कालावधीत एकदाही अवघड क्षेत्रातील शाळेत सेवा बजावलेली नाही. सर्व सेवा सर्वसाधारण क्षेत्रातच झाली आहे. त्या शिक्षकांना राज्य शासनाकडून दिलासा मिळाला आहे.
-

अवघडमधील नियुक्त्या २१ ला जाहीर

बदलीसाठी होकार किंवा नकार कळवण्यासाठी ६ ते ८ मार्चपर्यंत शिक्षकांना मुदत दिली आहे. भरलेल्या अर्जांची छाननी ९ ते ११ मार्चपर्यंत शिक्षणाधिकारी करतील. अवघड क्षेत्रातील रिक्त पदांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर १३ मार्चला केली जाईल. अवघड क्षेत्रातील रिक्त जागांचे पर्याय भरण्यासाठी शिक्षकांना १४ ते १७ मार्चपर्यंत मुदत आहे. त्यानंतर बदलीचे आदेश २१ मार्चला प्रसिद्ध होतील.